सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 11:58 IST2025-08-01T11:58:42+5:302025-08-01T11:58:55+5:30
Samsung TV outage: सॅमसंग टीव्ही युजर त्यांच्या स्मार्ट टीव्हीवर कोणतेही अॅप उघडू शकत नाहीएत. भारतातही असे अनेक वापरकर्ते आहेत ज्यांना अशा समस्या येत आहेत.

सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
सॅमसंगची स्मार्ट टीव्ही सेवा बंद पडली आहे. यामुळे मोठ्या संख्येने युजर तक्रार करू लागले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, डाऊन डिटेक्टरवर तक्रारींचा पाऊस सुरु झाला आहे.
सॅमसंगची स्मार्ट टीव्ही सॅमसंगच्या टीव्हीसाठीचे अॅप आहे. जवळपास ८० टक्के युजरना या अॅपचा अॅक्सेस करता येत नाहीय. डाऊन डिटेक्टरवर २५०० हून अधिक जणांनी तक्रार नोंदविली आहे. १३ टक्के लोकांना लॉगिन करता येत नाहीय. सॅमसंगने यावर काहीही स्पष्टीकरण दिलेले नाहीय.
सॅमसंग टीव्ही युजर त्यांच्या स्मार्ट टीव्हीवर कोणतेही अॅप उघडू शकत नाहीएत. भारतातही असे अनेक वापरकर्ते आहेत ज्यांना अशा समस्या येत आहेत. आउटेजचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु त्याचा मुख्य परिणाम अमेरिकन ग्राहकांवार झाला आहे. लोक सॅमसंगच्या EU कम्युनिटी पेजवर टीव्हीशी संबंधित समस्या देखील सतत शेअर करत आहेत. कोणताही टीव्ही घेतला की त्याची कंपनी अँड्रॉईडवर त्यांचे प्लॅटफॉर्म अॅप देते. यावरून तुम्ही कंटेंट दाखविणारी अॅप इन्स्टॉल करून ती ओपन करू शकता. परंतू, सॅमसंगच्याच अॅपला समस्या असल्याने टीव्ही बंद पडले आहेत.
सॅमसंगचा सर्व्हर डाउन असल्याने आज रात्री टीव्हीही पाहू शकत नाही, असे एका युजरने म्हटले आहे. तर एकाने सॅमसंगची खिल्ली उडविली आहे. पाच वर्षे जुन्या टीव्हीऐवजी नवीन सॅमसंग टीव्ही खरेदी केला, पण सर्व्हर डाउन असल्याचे लक्षात आले, असे त्याने म्हटले आहे.