Samsung Galaxy Z Fold 3 आणि Flip 3 ची भारतीय किंमत लीक; फोल्ड 2 पेक्षा कमी किंमतीत होणार लाँच  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 14:57 IST2021-08-04T14:56:41+5:302021-08-04T14:57:30+5:30

Samsung Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 च्या भारतीय किंमतीची माहिती लीक झाली आहे. Galaxy Z Flip 3 सर्वात स्वस्त फोल्डेबल फोन असू शकतो.  

Samsung galaxy z fold 3 and samsung galaxy z flip 3 expected price in india leaked  | Samsung Galaxy Z Fold 3 आणि Flip 3 ची भारतीय किंमत लीक; फोल्ड 2 पेक्षा कमी किंमतीत होणार लाँच  

Samsung Galaxy Z Fold 3 आणि Flip 3 ची भारतीय किंमत लीक; फोल्ड 2 पेक्षा कमी किंमतीत होणार लाँच  

सॅमसंग लवकरच Samsung Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 स्मार्टफोन बाजारात सादर करणार आहे. गेले कित्येक दिवस या स्मार्टफोन्सची माहिती लीक आणि बातम्यांमधून समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी या स्मार्टफोन्सच्या युरोपियन किंमतीची माहिती आली होती. आता 91Mobiles ने Yogesh Brar च्या साहाय्याने या फोन्सच्या भारतातील किंमतीची माहिती सांगितली आहे. Samsung Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 दोन्ही महागडे फोन्स असू शकतात. परंतु या फोन्सची किंमत आधीच्या सॅमसंग फोल्डेबल फोन्सपेक्षा कमी असू शकते.  

Samsung Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 ची संभाव्य किंमत  

योगेशने दिलेल्या माहितीनुसार, Galaxy Z Fold 3 ची किंमत 1,35,000 रुपये तर MRP 1,49,990 रुपये असेल. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये Fold 2 गेल्यावर्षी 1,49,990 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. Galaxy Z Flip 3 ची रिटेल प्राईज 80,000 ते 90,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते. Flip 3 भारतात लाँच होणारा सर्वात किफायतशीर फोल्डेबल स्मार्टफोन असेल. 

टिप्सटर इव्हन ब्लासने अलीकडेच Samsung Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 च्या किंमतीची माहिती दिली होती. त्याने दिलेल्या लीकनुसार, Z Fold 3 ची आरंभिक किंमत 1,899 युरो (जवळपास 1,67,000 रुपये) आणि Galaxy Z Flip 3 ची किंमत 1,099 युरो (जवळपास 1,00,000 रुपये) असू शकते.  

Samsung Galaxy Z Fold 3 

सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोन 7.55-इंचाचा फोल्डेबल डिस्प्ले आणि 6.2- इंचाच्या कवर डिस्प्लेला सपोर्ट करेल. अँड्रॉइड ओएससह या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 888 चिपसेट मिळू शकतो. या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 12MP चा मुख्य सेन्सर, 12MP ची अल्ट्रावाईड लेन्स आणि 12MP चा टेलीफोटो सेन्सर दिला जाऊ शकतो. या फोल्डेबल डिस्प्लेमध्ये 16MP चा अंडर स्क्रीन कॅमेरा सेन्सर असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.  

Samsung Galaxy Z Flip3 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy Z Flip3 मध्ये 6.7 इंचाचा फोल्डेबल डिस्प्ले देण्यात येईल. त्याचबरोबर फोनमध्ये 1.9-इंचाचा डिस्प्ले कव्हरवर दिला जाईल. या फोल्डेबलमध्ये आतल्या बाजूस 10MP चा सेल्फी कॅमेरा आणि बॅक पॅनलवर 12MP-12MP चे दोन कॅमेरे असतील. Galaxy Z Flip3 स्मार्टफोन 3,300mAh च्या बॅटरीला सपोर्ट करू शकतो. या फोनमध्ये Snapdragon 888 चिपसेट असेल, सोबत 8GB रॅम आणि 128GB किंवा 256GB स्टोरेज दिली जाऊ शकते.  

Web Title: Samsung galaxy z fold 3 and samsung galaxy z flip 3 expected price in india leaked