Samsung: तुमचा फक्त इशारा आणि काम फत्ते! बहुप्रतिक्षित हेडसेट सॅमसंग गॅलेक्सी एक्स आर लॉन्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 12:47 IST2025-10-23T12:43:49+5:302025-10-23T12:47:33+5:30
Samsung Galaxy XR headset: दक्षिण कोरियाई कंपनी सॅमसंगने अखेर आपला बहुप्रतिक्षित सॅमसंग गॅलेक्सी एक्सआर हेडसेट लॉन्च केला.

Samsung: तुमचा फक्त इशारा आणि काम फत्ते! बहुप्रतिक्षित हेडसेट सॅमसंग गॅलेक्सी एक्स आर लॉन्च
दक्षिण कोरियाई कंपनी सॅमसंगने अखेर आपला बहुप्रतिक्षित सॅमसंग गॅलेक्सी एक्सआर हेडसेट लॉन्च केला. हे हेडसेट गुगलच्या अँड्राईड एक्सआर सिस्टीमवर चालणार असून, यामध्ये जेमिनी एआयचा डीप सपोर्ट देण्यात आला. सध्या हे हेडसेट फक्त दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत लॉन्च करण्यात आले असून, लवकरच ते इतर जागतिक बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हे हेडसेट ॲपल व्हिजन प्रोला थेट टक्कर देईल, असा दावा केला जात आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एक्स आरचे वजन ५४५ ग्रॅम असून तो मायक्रो-ओएलईडी डिस्प्लेवर आधारित आहे. हा हेडसेट क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन XR2+ Gen 2 प्रोसेसरसह येतो आणि त्यात १६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज आहे. या हेडसेटमध्ये मध्ये ६.५ मेगापिक्सेलचा 3D कॅमेरा सिस्टम, दोन उच्च रिझोल्यूशन कॅमेरा सेंसर, ६ ट्रॅकिंग कॅमेरा सेंसर, ४ आय ट्रॅकिंग कॅमेरा आणि डेप्थ सेंसर दिले गेले आहेत. सिंगल चार्जवर या हेडसेटचा व्हिडिओ प्लेबॅक वेळ २.५ तास आहे.
सॅमसंगच्या गॅलेक्सी एक्सआरमध्ये गूगल जेमिनी एआय इंटिग्रेशन देण्यात आले, ज्यामुळे युजर्सला नवीन मार्गांनी एक्सप्लोर, कनेक्ट आणि क्रिएट करण्याची क्षमता मिळते. हे हेडसेट डोळे आणि हाताच्या इशाऱ्यांद्वारे इंटरेक्शन करणे शक्य आहे. गूगलने आपल्या सर्व अॅप्स, जसे की गूगल मॅप्स, यूट्यूब, गूगल फोटोज, गूगल मीट, क्रोम, आणि गूगल टीव्ही यांना या हेडसेटसह ऑप्टिमाइज केले. गूगल मॅप्समध्ये इमर्सिव्ह 3D व्ह्यू असलेली फीचर मिळवता येईल, ज्यामुळे यूजर्स 3D लँडमार्क एक्सप्लोर करू शकतात.
किंमत आणि लॉन्च ऑफर
या हेडसेटची किंमत १ हजार ७९९ डॉलर (जवळपास १.५८ लाख) आहे, जी अॅपल व्हिजन प्रोच्या किमतीच्या जवळ आहे. लॉन्च ऑफरमध्ये, ग्राहकांना एक वर्षासाठी गुगल वन प्रो, युट्युब प्रीमियम, गुगल प्ले पास, युट्यूब टीव्ही प्लस सब्सक्रिप्शन आणि एनबीए लीग पास इत्यादी विनामूल्य दिले जाते.