samsung galaxy s21 plus and s21 ultra does not include charging earphones like Apple | सॅमसंगचं Apple च्या पावलावर पाऊल; फ्लॅगशिप फोन्समध्ये ना चार्जर, ना ईयरफोन्स?

सॅमसंगचं Apple च्या पावलावर पाऊल; फ्लॅगशिप फोन्समध्ये ना चार्जर, ना ईयरफोन्स?

ठळक मुद्देसॅमसंगचे नवे फ्लॅगशिप फोन उद्या होणार लाँच

Samsung ही कंपनी १४ जानेवारीला आपला नवा फ्लॅगशिप फोन लाँच करणार आहे. तसंच अनेक माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार या इव्हेंटमध्ये कंपनी Galaxy S21, Galaxy S21+ आणि Galaxy S21 Ultra 5G हे फोन्स लाँच करण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून समोर येत असलेल्या माहितीदरम्यानच WinFuture.de च्या रिपोर्टमध्ये या मोबाईलचं पॅकेजिंग कसं असेल याबाबत सांगण्यात आलं आहे. यापूर्वी Apple ने देखील आपल्या नव्या फोनसह चार्जर आणि ईयरफोन देणं केलं होतं बंद.

रोलँड क्वॉन्टच्या (@rquandt) रिपोर्टमध्ये दोन ईमेजेस दाखवण्यात आल्या आहेत. तसंच Galaxy S21+ आणि Galaxy S21 Ultra 5G च्या रिटेल बॉक्सच्या त्या ईमेज असल्याचा दावा करण्यात आला आहे. दोन्ही बॉक्सचा कलर काळ्या रंगाचा आहे. तसंच याव्यतिरिक्त बॉक्स कंटेंट असलेल्या मार्केटिंग पोस्टरमध्ये यात मोबाईलसोबत काय काय मिळणार हे दाखवण्यात आलं आहे. यानुसार बॉक्समध्ये केवळ स्टार्ट गाईड, युएसबी सी केबल आणि एक सीम इजेक्टर टुल मिळणार आहे.बॉक्समध्ये चार्जर, ईयरफोन्स नाही

या व्यतिरिक्त या रिपोर्टमध्ये चार्जर आणि ईयरफोन्स हे बॉक्स कंटेटच्या रूपात दाखवण्यात आले नाहीत. यापूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार सॅमसंग युनायटेड किंगडम्ससारख्या ठिकाणी चार्जर आणि ईयरफोन्स देणार नसल्याचं म्हटलं होतं. यापूर्वी सॅमसंग किमान AKG ईयरफोन्स तरी बॉक्ससोबत देईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. परंतु रिपोर्टनुसार यात ते कंटेट सामील नसल्याचं समोर आलं आहे. कंपनीनं मात्र अद्याप याबाबत काही माहिती दिलेली नाही.

या कलर ऑप्शन्समध्ये मिळू शकतात फोन्स

रोलँड क्वॉन्टच्या माहितीनुसार Galaxy S21 सीरिजचे फोन ब्लॅक, व्हाईट, पिंक, पर्पल या कलर्स ऑप्शनमध्ये मिळणार आहेत. तर लीक ईमेजेसमध्ये सांगितल्यानुसार Galaxy S21+ टायटॅनिअम कॅमेरा बंपसह रेड कलरमध्ये येणार आहे. तसंच हा फोन अन्य ५ कलर्स ऑप्शनसह मिळणार आहे. 

Web Title: samsung galaxy s21 plus and s21 ultra does not include charging earphones like Apple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.