48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह येऊ शकतो Samsung Galaxy M22; लाँचपूर्वी फीचर्सचा खुलासा
By सिद्धेश जाधव | Updated: July 15, 2021 13:10 IST2021-07-15T13:10:24+5:302021-07-15T13:10:47+5:30
Samsung Galaxy M22 specifications: Samsung Galaxy M22 मध्ये इन्फिनिटी यु नॉच दिसत आहे. तसेच फोनच्या मागे चौरसाकृती कॅमेरा मॉड्यूल आहे.

48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह येऊ शकतो Samsung Galaxy M22; लाँचपूर्वी फीचर्सचा खुलासा
सॅमसंगच्या मिड रेंज स्मार्टफोन Samsung Galaxy M22 चे स्पेसिफिकेशन आणि रेंडर फोनच्या अधिकृत लाँचपूर्वीच लीक झाले आहेत. गीकबेंच आणि इतर सर्टिफिकेशन वेबसाईट्सनंतर आता Dealntech वेबसाइटवर या फोनची नवीन माहिती समोर आली आहे. लीक झालेल्या फोनची डिजाइन Galaxy A22 सारखी दिसत आहे.
Samsung Galaxy M22 मध्ये इन्फिनिटी यु नॉच दिसत आहे. तसेच फोनच्या मागे चौरसाकृती कॅमेरा मॉड्यूल आहे. हा एक क्वाड कॅमेरा सेटअप आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली एक एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. फोनच्या तळाला टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि स्पिकर ग्रिल आहे.
Samsung Galaxy M22 चे संभाव्य स्पेसिफिकेशन
सॅमसंग गॅलेक्सी M22 च्या लीक स्पेसिफिकेशन्सनुसार, या आगामी सॅमसंग स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G80 चिपसेट देण्यात येईल. तसेच फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB बिल्ट-इन स्टोरेज असेल. गॅलेक्सी M22 मध्ये 6.5-इंचाचा एचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह दिला जाऊ शकतो.
सॅमसंग गॅलेक्सी M22 मधील क्वाड-कॅमेरा सेटअपमध्ये 48MP चा मुख्य सेन्सर, 8MP चा अल्ट्रावाईड सेन्सर, 2MP चा मॅक्रो सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर 13MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. या फोनमध्ये 25W फास्ट-चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी मिळू शकते.