Samsung चा Galaxy M21 Prime Edition लवकरच येईल भारतात; किंमत पण असेल कमी 

By सिद्धेश जाधव | Published: June 7, 2021 12:45 PM2021-06-07T12:45:48+5:302021-06-07T12:47:27+5:30

Samsung Galaxy M21 Prime Edition: Samsung Galaxy M21 Prime Edition सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर SM-M215G मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. 

Samsung Galaxy M21 Prime Edition India Launch soon   | Samsung चा Galaxy M21 Prime Edition लवकरच येईल भारतात; किंमत पण असेल कमी 

हा फोटो Samsung Galaxy M31 Prime Edtion चा आहे.

googlenewsNext

Samsung ने गेल्यावर्षी ‘गॅलेक्सी एम’ सीरीजमध्ये Samsung Galaxy M31 आणि Samsung Galaxy M21 लाँच केले होते. या स्वस्त मोबाईल फोन्सचे यश पाहून, कंपनीने Samsung Galaxy M31 Prime Edition सादर केला होता. हा फोन सॅमसंग आणि अमेझॉन इंडियाच्या भागीदारीत सादर करण्यात आला होता. आता अशी बातमी येत आहे कि, कंपनी गॅलेक्सी एम21 स्मार्टफोनची पण अशीच एक आवृत्ती घेऊन येणार आहे, ज्याचे नाव Samsung Galaxy M21 Prime Edition असेल.  

Samsung Galaxy M21 Prime Edition सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट केला गेला आहे. हा फोन वेबसाइटवर SM-M215G मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. गिजमोचायनाच्या रिपोर्टनुसार, सॅमसंगचा हा आगामी स्मार्टफोन गुगल प्ले कंसोल आणि इंडियन सर्टिफिकेशन साइट BIS वर देखील लिस्ट झाला आहे. त्यामुळे गॅलेक्सी एम21 प्राइम एडिशन लवकरच बाजारात दाखल होईल, अशी आशा आहे. 

Samsung Galaxy M31 Prime Edition चे स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy M31 Prime Edtion 6,000 एमएएचच्या मोठ्या आणि शक्तिशाली बॅटरीसह लाँच झाला आहे. या फोनमध्ये क्चॉड रियर कॅमेरा असेल, यात मुख्य सेन्सर 64 मेगापिक्सलचा आहे. या मुख्य सेन्सरसोबत फोनमध्ये 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.  

Samsung Galaxy M31 Prime Editon इनफिनिटी ‘यू’ डिस्प्लेला सपोर्ट करतो. तसेच, या स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाची फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. सॅमसंगने गॅलेक्सी एम31 अँड्रॉइड 10 ओएससह लाँच केला आहे. फोनमध्ये 1.74गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे. 

Web Title: Samsung Galaxy M21 Prime Edition India Launch soon  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.