6,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह 21 जुलैला लाँच होऊ शकतो Samsung Galaxy M21 2021 Edition
By सिद्धेश जाधव | Updated: July 16, 2021 19:09 IST2021-07-16T19:08:52+5:302021-07-16T19:09:29+5:30
Samsung Galaxy M21 2021 Edition: Samsung Galaxy M21 2021 Edition स्मार्टफोन 21 जुलैला दुपारी 12 वाजता लाँच होऊन शॉपिंग साईट अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

6,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह 21 जुलैला लाँच होऊ शकतो Samsung Galaxy M21 2021 Edition
Samsung ने आज अधिकृतपणे Samsung Galaxy M21 2021 Edition ची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन येत्या 21 जुलैला भारतात लाँच केला जाईल. हा स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच केलेल्या Samsung Galaxy M21 स्मार्टफोनचा अपग्रेड व्हर्जन असेल अशी अपेक्षा आहे. Samsung Galaxy M21 2021 Edition स्मार्टफोन 21 जुलैला दुपारी 12 वाजता लाँच होऊन शॉपिंग साईट अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Samsung Galaxy M21 2021 Edition ची डिजाईन
या आगामी सॅमसंग स्मार्टफोनमध्ये ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले डिजाईन देण्यात येईल. या फोनमधील स्क्रीनच्या तिन्ही कडा बेजललेस असतील परंतु खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात येईल. फोटोमध्ये फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिसत आहे. हा कॅमेरा सेटअप वरच्या बाजूला डावीकडे वर्टिकल शेपमध्ये आहे.
Samsung Galaxy M21 2021 Edition चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी एम21 2021 एडिशनची घोषणा करताना कंपनीने सांगितले कि हा मोबाईल फोन 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करेल. तसेच या फोनच्या बॅक पॅनलवरील रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर असेल. Samsung Galaxy M21 2021 Edition मध्ये 6.4 इंचाचा फुलएचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले मिळणार आहे.