15 तासांच्या बॅटरी बॅकअपसह Samsung Galaxy Buds2 येणार भारतात; किंमत आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 19:33 IST2021-08-25T19:33:33+5:302021-08-25T19:33:39+5:30
Samsung Galaxy Buds 2: देशात Samsung Galaxy Buds2 ची प्री बुकिंग पुढल्या आठवड्यात सुरु होऊ शकते. Samsung Galaxy Buds2 इयरबड्स सिंगल चार्जमध्ये 5 तासांचा बॅटरी बॅकअप देतात.

15 तासांच्या बॅटरी बॅकअपसह Samsung Galaxy Buds2 येणार भारतात; किंमत आली समोर
Samsung ने काही दिवसांपूर्वी आपल्या ‘Galaxy Unpacked’ इव्हेंटमधून काही डिवाइस सादर केले होते. या कंपनीच्या फ्लॅगशिप फोल्डेबल फोन्ससह Galaxy Buds2 इयरबड्सचा देखील समावेश होता. जागतिक बाजारात सादर झालेल्या या इयरबड्सची भारतीय सॅमसंग चाहते देखील वाट बघत आहेत. आता बातमी आली आहे कि सॅमसंगचे लेटेस्ट ट्रू वायरलेस इयरबड्स (TWS) लवकरच भारतात देखील लाँच होतील. येत्या काही दिवसांत या इयरबड्सची भारतात प्री ऑर्डर बुकिंग सुरु होईल. कंपनीने गॅलेक्सी बड्स 2 च्या भारतीय किंमतीची माहिती दिली नाही. परंतु लिक्समधून Galaxy Buds2 च्या भारतीय किंमतीचा खुलासा झाला आहे.
Samsung Galaxy Buds2 ची भारतीय किंमत
91Mobiles ने दिलेल्या माहितीनुसार, देशात Samsung Galaxy Buds2 ची प्री बुकिंग पुढल्या आठवड्यात सुरु होऊ शकते. तसेच Galaxy Buds2 ची भारतीय किंमत 12,990 रुपये असू शकते. हे बड्स व्हाइट, ग्रॅफाइट, ऑलिव्ह आणि लॅव्हेंडर रंगात उपलब्ध होतील.
Samsung Galaxy Buds2 चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy Buds2 इयरबड्स सिंगल चार्जमध्ये 5 तासांचा बॅटरी बॅकअप देतात, सोबत चार्जिंग केस असल्यास हे बड्स एकूण 15 तास सहज वापरता येतात. यातील 2 वे डायनॅमिक स्पीकर क्रिस्प, हाय नोट आणि बेस साऊंड देण्यास सक्षम आहेत. यातील Active Noise Cancellation मोड बाहेरील 98 टक्के नॉइज कमी करतो. हे बड्स ग्लॉसी टेक्चर आणि इन-इयर डिजाइनसह सादर करण्यात आले आहेत. ज्यांच्यासोबत सिलिकॉन इयर टिप देण्यात आले आहेत.