Samsung MWC 2021: सॅमसंगने करणार 28 जूनला ऑनलाइन इव्हेंटचे आयोजन; जाणून काय होणार लाँच 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 06:19 PM2021-06-22T18:19:21+5:302021-06-22T18:19:50+5:30

Samsung Galaxy MWC 2021: 28 जूनला Samsung Galaxy MWC Virtual Event चे आयोजन भारतीय वेळेनुसार रात्री 10:45 वाजता करण्यात आले आहे.  

Samsung announces virtual mwc event teasing silhouettes hint at new devices news  | Samsung MWC 2021: सॅमसंगने करणार 28 जूनला ऑनलाइन इव्हेंटचे आयोजन; जाणून काय होणार लाँच 

Samsung MWC 2021: सॅमसंगने करणार 28 जूनला ऑनलाइन इव्हेंटचे आयोजन; जाणून काय होणार लाँच 

Next

Samsung ने 28 जूनला Mobile World Congress (MWC) 2021 वर एक ऑनलाइन इव्हेंट करण्याची घोषणा केली आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी कोणते डिवाइस लाँच करेल याची माहिती कंपनीने दिली नाही. परंतु सॅमसंगने सादर केलेल्या टीजरमधून आगामी येत्या प्रॉडक्ट्सची कल्पना मिळाली आहे. कंपनी नवीन स्मार्टवॉच, फोल्डेबल फोन आणि एक टॅबलेट असे डिवाइस लाँच करू शकते.  

Samsung ने आपल्या न्यूज रूम वेबसाइटवरून MWC 2021 मधील इव्हेंटची माहिती दिली आहे. त्यानुसार, 28 जूनला Samsung Galaxy MWC Virtual Event 07:15pm CET वाजता सुरु होईल. भारतीय वेळेनुसार रात्री 10:45 वाजता तुम्ही हा सॅमसंगचा इव्हेंट कंपनीच्या YouTube चॅनेल आणि Samsung Newsroom वेबसाइटवर थेट बघू शकता.  

कोणत्या घोषणा करेल सॅमसंग? 

सॅमसंगच्या MWC इव्हेंटचा एक टीजर कंपनीने प्रकाशित केला आहे. कंपनीच्या MWC टीजरमध्ये एक स्मार्टवॉच, एक फोल्डेबल फोन आणि एक टॅबलेटची आकृती दिसत आहे. तसेच या टीजरमध्ये Samsung Galaxy S21 Ultra चा कॅमेरा मोड्यूल देखील दिसला आहे आणि तळाला Knox security solution चा लोगो देखील आहे. 

सॅमसंगने MWC 2021 ऑनलाइन इव्हेंटच्या घोषणेसोबत म्हटले आहे कि कंपनी ‘स्मार्टवॉचच्या भविष्यासाठी एक विजन’ सादर करेल. तसेच ‘युजर्ससाठी एक नवीन अनुभव आणि डेवेलपर्सना नवीन संधी’ चा उल्लेख देखील करण्यात आला आहे. यात स्मार्ट डिवाइसच्या सिक्योरिटीचा उल्लेख देखील आहे.  

आतापर्यंत आलेलया रिपोर्ट्नुसार, सॅमसंग MWC इव्हेंटमध्ये एक नवीन Wear OS, Samsung Galaxy Z Fold 3, Galaxy Z Flip 3, Galaxy Tab S8 सीरीज आणि Galaxy Watch 4 स्मार्टवॉच या गोष्टी लाँच केल्या जाऊ शकतात. Samsung दरवर्षी आपल्या ‘Galaxy Unpacked’ इव्हेंटमध्ये फ्लॅगशिप डिवाइस लाँच करते. परंतु MWC इव्हेंटमध्ये या प्रॉडक्ट्सचा टीजर नक्कीच दिसले, अशी अपेक्षा आहे.  

Web Title: Samsung announces virtual mwc event teasing silhouettes hint at new devices news 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app