Samsung Galaxy S25 Ultra च्या खरेदीवर ६० हजारांची सूट, कुठं मिळतोय इतका स्वस्त?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 17:48 IST2025-12-19T17:47:44+5:302025-12-19T17:48:32+5:30
Samsung Galaxy S25 Ultra Price Cut: सॅमसंग गॅलेक्सी एस २५ अल्ट्राची किंमत आतापर्यंतची सर्वात मोठी कपात झाली.

Samsung Galaxy S25 Ultra च्या खरेदीवर ६० हजारांची सूट, कुठं मिळतोय इतका स्वस्त?
सॅमसंग गॅलेक्सी एस २५ अल्ट्राची किंमत आतापर्यंतची सर्वात मोठी कपात झाली. सॅमसंग गॅलेक्सी एस २६ लॉन्च होण्यापूर्वी हा फोन जवळजवळ निम्म्या किमतीत उपलब्ध आहे. इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर टाटा क्रोमाच्या वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोअर्सवर सध्या सुरू असलेल्या क्रोमॅटिक इयर-एंड सेल दरम्यान हा फोन खूपच स्वस्तात खरेदी करता येईल. हा सेल येत्या ४ जानेवारी २०२६ पर्यंत सुरू असेल.
दक्षिण कोरियन कंपनीचा हा फोन १ लाख २९ हजार ९९९ च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला. या सेलमध्ये, हा फोन ६९ हजार ९९९ च्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. या फोनच्या खरेदीवर बँक डिस्काउंट आणि एक्स्चेंज बोनससह अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. या सर्व ऑफर्स एकत्रित करून ग्राहक ६० हजारांपर्यंत बचत करू शकतात. या ऑफर्ससंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ग्राहकांनी टाटा क्रोमाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
या स्मार्टफोनमध्ये ६.९-इंचाचा विशाल डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे 3120 x 1440 पिक्सेल रिझोल्यूशन (Quad HD+) आणि 120Hz हाय रिफ्रेश रेट युजर्सना एक उत्कृष्ट व्हिज्युअल अनुभव देतात. गेमिंग असो किंवा व्हिडिओ स्ट्रीमिंग, याचा डिस्प्ले अतिशय शार्प कामगिरी करतो. या फोनमध्ये २०० मेगापिक्सेल मुख्य कॅमेऱ्यासह ५० मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि ५० मेगापिक्सेलचा टेलिफोटो लेन्स मिळते.
या प्रीमियम डिव्हाइसला ५००० एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हा फोन ४५ वॅट वायरलेस फास्ट चार्जिंग आणि १५ वॅट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करतो, ज्यामुळे बॅटरी चार्ज करणे अधिक सोयीचे झाले आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट या अत्यंत वेगवान प्रोसेसरने सज्ज आहे. मल्टीटास्किंग आणि हेवी गेमिंगसाठी यात १२८ जीबी रॅम आणि डेटा साठवण्यासाठी १ टीबी पर्यंतचा अवाढव्य स्टोरेज पर्याय उपलब्ध आहे. हा फोन Android 15 वर आधारित सॅमसंगच्या नव्या OneUI 7 वर चालतो.