जुना फोन रिसायकल करून मिळवा पैसे; या वेबसाइट्सवर मिळेल चांगली किंमत  

By सिद्धेश जाधव | Published: June 5, 2021 01:04 PM2021-06-05T13:04:13+5:302021-06-05T13:05:53+5:30

Sale old gadgets online: कॅशीफाय, बुडली, इन्स्टाकॅश, यांत्रा इत्यादी ऑनलाईन वेबसाईट्स तुम्हाला तुमच्या जुन्या गॅजेट्सची चांगली किंमत देतात.  

Sale Old smartphone online on these websites with great price  | जुना फोन रिसायकल करून मिळवा पैसे; या वेबसाइट्सवर मिळेल चांगली किंमत  

या वेबसाईट्सवर फोन्स, टीव्ही, लॅपटॉप आणि इतर अनेक गॅजेट्स देखील विकता येतील. काही वेबसाइट्सवर तुम्ही जुन्या गॅजेट्सची खरेदी पण करू शकता.

Next

टेक्नॉलॉजी रोज बदलत असते. चार ते पाच महिन्यानंतर स्मार्टफोनचा नवीन व्हर्जन बाजारात येतो. कंपन्या नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह नवीन फोन सतत लाँच करत असतात. अश्यावेळी आपण ट्रेंड पाहून नवीन गॅजेट्स विकत घेतो. त्यामुळे जुने फोन्स, गॅजेट्स तसेच पडून राहतात किंवा आपण घाई घाईत ते कमी किंमतीत विकून टाकतो. आज आम्ही तुम्हाला अश्या काही वेबसाइट्सबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हाला तुमच्या जुन्या स्मार्टफोनची चांगली किंमत देतील. म्हणजे तुमचा फोन रिसायकल देखील होईल आणि तुमची कमाई देखील होईल. या वेबसाईट्सवर फोन्स, टीव्ही, लॅपटॉप आणि इतर अनेक गॅजेट्स देखील विकता येतील. काही वेबसाइट्सवर तुम्ही जुन्या गॅजेट्सची खरेदी पण करू शकता. (Recycle old phones online with help of these website) 

कॅशीफाय 

या वेबसाइटवर तुम्ही फोन विकण्यासोबतच रिसायकल आणि रिपेअर पण करू शकता. इथे स्मार्टवॉच, लॅपटॉप, टॅबलेट, डेस्कटॉप, गेमिंग कन्सोल, डीएसएलआर एवढंच काय तर  इयरबड्स विकण्याचा देखील पर्याय उपलब्ध आहे. www.cashify.in वर जाऊन योग्य तो पर्याय निवडा.  

बुडली  

www.budli.in हि अजून एक वेबसाईट आहे जी जुने फोन विकत घेते. जर तुमचा मॉडेल तर तुम्हाला त्वरित त्याची किंमत सांगितली जाते. तुम्हाला ती किंमत मान्य असेल तर तुमचा डिवाइस तुमच्या दारात येऊन ताब्यात घेतला जातो आणि चौवीस तासांच्या आत तुमच्या बँक अकॉउंटमध्ये पैसे पाठवले जातात.  

इन्स्टाकॅश 

www.getinstacash.in वर तुम्ही तुमचा कोणताही जुना गॅजेट सहज विकू शकता आणि चांगली किंमत मिळवू शकता. इथे तुम्ही बुकिंग केल्यावर कंपनीचा कर्मचारी स्वतःहून तुमच्या घरात येऊन फोन घेऊन जाईल आणि किंमत देईल. 

यांत्रा 

www.yaantra.com हि अजून एक वेबसाईट आहे जी तुमच्या जुन्या गॅजेट्सना चांगली किंमत मिळवून देते. कंपनी दावा करते कि या वेबसाइटवर फक्त 60 सेकंदात जुना फोन विकत घेतला जातो. 

Web Title: Sale Old smartphone online on these websites with great price 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app