बापरे! ब्लॅकआऊट चॅलेज खेळणाऱ्या मुलीच्या मृत्यूने खळबळ, "या" देशात TikTok बंदीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 12:33 PM2021-01-24T12:33:07+5:302021-01-24T12:41:05+5:30

Tiktok Blackout Challenge : टिकटॉकवरील ब्लॅकआऊट चॅलेंज (Blackout Challenge) खेळताना एका दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याने इटलीमध्ये खळबळ उडाली आहे.

rest of world blackout challenge on tiktok 10 year old girl dies in italy | बापरे! ब्लॅकआऊट चॅलेज खेळणाऱ्या मुलीच्या मृत्यूने खळबळ, "या" देशात TikTok बंदीची मागणी

बापरे! ब्लॅकआऊट चॅलेज खेळणाऱ्या मुलीच्या मृत्यूने खळबळ, "या" देशात TikTok बंदीची मागणी

Next

केंद्रातील मोदी सरकारने चीनला मोठा दणका दिला आहे. लोकप्रिय अ‍ॅप टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आल्यानंतर आता आणखी एका देशात टिकटॉकवर कारवाई करण्यात आली आहे. टिकटॉकवरील ब्लॅकआऊट चॅलेंज (Blackout Challenge) खेळताना एका दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याने इटलीमध्ये खळबळ उडाली आहे. इटली सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

मुलगी तिच्या बाथरुमध्ये मोबाईलसह बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. तिच्या पाच वर्षांच्या बहिनीने तिला बेशुद्ध झालेलं पाहिलं. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचाराचादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी तिचा मोबाईल जप्त केला असून पुढील तपास सुरू केला आहे. मुलगी 'टिकटॉक'वर अशा प्रकारच्या कोणत्या चॅलेंजमध्ये सहभागी झाली आहे, हे तिच्या आई-वडिलांना माहिती नव्हतं. लहान मुलीने हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर त्यांना धक्का बसला आहे. त्यांनी इटालीतील एका वृत्तपत्राला प्रतिक्रिया देताना ती टिकटॉकवर डान्स व्हिडीओ पाहते इतकंच आपल्याला माहिती होतं. ती असं काही करेल हे कधीही वाटलं नाही असं म्हटलं आहे. 

आपल्या प्लॅटफॉर्मवर या प्रकारच्या चॅलेंजचा कोणताही कंटेट आढळला नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच या प्रकरणात सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं आश्वासन 'बाईटडान्स'ने (ByteDance) दिलं आहे. इटलीमध्ये या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. सोशल मीडियावर कठोरातील कठोर कारवाई करण्याची आणि बंदीची मागणी केली जात आहे. इटलीतील चाईल्ड प्रोटेक्शन कमिशनच्या अध्यक्षांनी देखील या प्रकरणात सरकारनं कारवाई करण्याची मागणी केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: rest of world blackout challenge on tiktok 10 year old girl dies in italy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.