नवी दिल्ली : गेल्या 4 वर्षांत चीनसह भारतात पाळेमुळे रोवलेल्या मोबाईल कंपनी शाओमीने दोन वर्षांपूर्वी टीव्हीची उत्पादने बाजारात आणली होती. तसेच सबब्रँड रेडमीचे फोनही कमी किंमतीत लाँचे केले होते. यामुळे सॅमसंग, ओप्पोसारख्या कंपन्यांना कमी किंमतीत मोबाईल उपलब्ध करावे लागले होते. आता शाओमी रेडमीचा पहिला स्मार्ट टीव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे.
शाओमीला जुलैमध्ये चीनकडून रेडमीच्या टीव्हीसाठी प्रमाणपत्र मिळाले आहे. शाओमीचे अध्यक्ष ली जून यांनी चीनची सोशल नेटवर्क साईट Weibo वर रेडमी टीव्ही लाँच करण्याचा एक पोस्टर पोस्ट केला आहे. याशिवाय कंपनीने टेलिव्हीजन व्यवसायासाठी एक सोशल मिडीया पेजही तयार केले आहे.
जून यांनी केलेल्या पोस्टमध्ये हा टीव्ही तब्बल 70 इंचाचा असणार असल्याचे दिसते. हा टीव्ही 29 ऑगस्टला चीनमध्ये लाँच होईल. या पोस्टमध्ये एका युजरने विचारले की, या कार्यक्रमात Redmi Note 8 पण लाँच होईल का, यावर जून यांनी थम्प्स अप इमोजीने उत्तर दिले आहे.
काही दिवसांपूर्वी शाओमीचे उपाध्यक्ष आणि रेडमीचे जनरल मॅनेजर लू वीबिंग यांनी वैबोवर पोस्ट टाकून रेडमी Note 8 चा उल्लेख केला होता. त्यांनी म्हटले होते, हे व्हेरिअंट जास्त ताकदवान असेल. एक अंदाज आहे, की हा स्मार्टफोन 64 मेगापिक्सलच्या कॅमेराने युक्त असेल. याच महिन्यात रेडमीने सांगितले होते, की सॅमसंगच्या नवीन कॅमेरा सेन्सरसह फोन लाँच करणार आहे. हा फोन भारतात ऑक्टोबर-डिसेंबरच्या काळात लाँच होईल.