शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

Redmi Note 10S भारतात लाँच; 4000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत Redmi Watch

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 15:44 IST

Redmi Note 10S, Redmi Watch specifications: रेडमीने भारतातील पहिले स्मार्टवॉच लाँच केले आहे. रेडमी नोट 10एस हा रेडमी नोट 10 सीरीजचा चौथा स्मार्टफोन आहे, या आधी रेडमीने या सीरीजचे तीन फोन मार्चमध्ये लाँच केले होते.

रेडमी इंडियाने कोरोना संकटात भारतात रेडमी नोट 10 एस लाँच (Redmi Note 10S) केला आहे. याचबरोबर कंपनीने भारतात पहिल्यांदाच स्मार्ट वॉचदेखील लाँच (Redmi Watch) केले आहे. रेडमी नोट 10एस हा रेडमी नोट 10 सीरीजचा चौथा स्मार्टफोन आहे, या आधी रेडमीने या सीरीजचे तीन फोन मार्चमध्ये लाँच केले होते. रेडमी नोट 10 एसमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या फोनची खासियत.... (Redmi Note 10S With MediaTek Helio G95 SoC, Redmi Watch With 11 Sports Modes Launched in India)

Xiaomi ने केले iPhone वरून ट्विट, बिल-मेलिंडा घटस्फोटाच्या आधारे केली जाहिरात, मग जे झाले...

Redmi Note 10S specificationsरेडमी नोट 10 एसमध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. मात्र, यामध्ये हाय रिफ्रेश रेट देण्यात आलेला नाही. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आली आहे. या फोनचे बॅक पॅनेल प्लॅस्टिकचे आहे, परंतू हा फोन दिसायला रेडमी नोट 10 सीरीज सारखाच आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलिओ जी 95 चिपसेट देण्यात आला आहे. सोबतच या फोनमध्ये 6GB/8GB रॅम ( किंमत 14,999 रुपये) आणि 64GB/128GB स्टोरेज (किंमत 15,999 रुपये) देण्यात आले आहे. यामध्ये यूएफएस 2.2 स्टोरेज आहे. 

Redmi Note 10S cameraरेडमी नोट 10एसमध्ये कॅमेरा सेटअप हा 64 मेगापिक्सल प्रायमरी आणि 8 मेगापिक्सल सेकंडरी असा आहे. याला अल्ट्रा वाईड अँगल आहे. सोबतच अन्य कॅमेरे हे 2-2 मेगापिक्सलचे आहेत. रिअर कॅमेराने 4K 30fps व्हिडीओ रेकॉर्ड करता येतात. या फोनला 13 मेगा पिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. 

Mobile SIM Fraud: सावधान! तुमच्या नावे 9 बनावट सिम असू शकतात; दहशतवाद, गुन्ह्यांसाठी वापर, असे करा ब्लॉक

Redmi Note 10S battery fast chargingRedmi note 10S मध्ये 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 33 वॉटचा फास्ट चार्जर देण्यात आला आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. 

Redmi Watch रेडमीने भारतातील पहिले स्मार्टवॉच लाँच केले आहे. 11 स्पोर्ट मोड, 24/7 हार्ट रेट ट्रॅकिंग, स्लीप ट्रॅकिंग, इन-बिल्ट जीपीएस, 5ATM वॉटर रेजिस्टेंस अशी फिचर आहेत. Redmi Watch मध्ये 1.4 इंच TFT LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. PPG हार्ट रेट सेंसर, थ्री-एक्सिस एक्सेलेरेशन सेंसर, जियोमैग्नेटिक सेंसर, बैरोमीटर, गायरोस्कोप आणि एक एम्बिएंट लाइट सेंसर देण्यात आला आहे. दोन तासांत एकदा पूर्ण चार्ज झाले की 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.  

टॅग्स :xiaomiशाओमी