Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:28 IST2025-11-04T18:25:44+5:302025-11-04T18:28:34+5:30
RedMagic 11 Pro Launched: रेडमॅजिक कंपनीने आपला अत्यंत शक्तिशाली स्मार्टफोन रेडमॅजिक ११ प्रो जागतिक बाजारपेठेत लॉन्च केला.

Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
गेमिंग स्मार्टफोनच्या जगात आपले वर्चस्व कायम ठेवत रेडमॅजिक कंपनीने आपला अत्यंत शक्तिशाली स्मार्टफोन रेडमॅजिक ११ प्रो जागतिक बाजारपेठेत लॉन्च केला आहे. हा फोन त्याच्या जबरदस्त हार्डवेअर, मोठा डिस्प्ले आणि गेमिंगसाठी खास बनवलेल्या फीचर्समुळे गेमर्सचे लक्ष वेधून घेत आहे.
डिस्प्ले आणि स्टोरेज
रेडमॅजिक ११ प्रो मध्ये 1.5K रिझोल्यूशन आणि १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.८५-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो ९५.३ टक्के आहे, ज्यामुळे तो आणखी प्रीमियम लूक देतो. कंपनीने या फोनमध्ये स्टार शील्ड आय प्रोटेक्शन २.०, मॅजिक टच ३.० आणि वेट हँड टच सपोर्ट सारख्या टेक्नोलॉजीचा समावेश केला. हा फोन २४ जीबी पर्यंत रॅम आणि १ टीबी पर्यंत स्टोरेजसह उपलब्ध असून अँड्रॉइड १६-आधारित रेडमॅजिक ओएस ११ वर चालतो.
कॅमेरा आणि बॅटरी
हा फोन ५० मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आणि ५० मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. दीर्घकाळ गेमिंग करण्यासाठी या फोनमध्ये ७५०० एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली, जे ८० वॅट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनचे वजन २३० ग्रॅम आहे आणि त्याची जाडी ८.९ मिमी आहे.
किंमत आणि उपलब्धता
रेडमॅजिक ११ प्रोचा बेस व्हेरिएंट १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह येतो. त्याची किंमत अमेरिकेत $७४९ (अंदाजे रु. ६६,५००) आणि युरोपमध्ये ६९९ युरो (अंदाजे रु. ७१,५००) आहे. २४ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत अमेरिकेत $९९९ (अंदाजे रु. ८८,६००) आणि युरोपमध्ये ९९९ युरो (अंदाजे रु. १,०२,०००) इतकी आहे.