recharge only 500 rupees of tata sky and get a tata tiago car in lucky draw contest | Tata Sky युझर्ससाठी भन्नाट ऑफर! ५०० रुपयांचे रिचार्ज करा; टाटा टियागो जिंका

Tata Sky युझर्ससाठी भन्नाट ऑफर! ५०० रुपयांचे रिचार्ज करा; टाटा टियागो जिंका

ठळक मुद्देTATA SKY ने ग्राहकांसाठी विशेष ऑफर ५०० रुपयांच्या रिचार्जवर टाटा टिगोर कार जिंकण्याची संधी०६ फेब्रुवारीपर्यंत ऑफर मर्यादित

नवी दिल्ली : Tata Sky ने युझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण टाटा स्कायने आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली आहे. या ऑफरमुळे टाटा टिगोर गाडी जिंकण्याची सुवर्ण संधी ग्राहकांना मिळणार आहे.  

टाटा स्कायने ग्राहकांसाठी भन्नाट योजना आणली आहे. केवळ ५०० रुपयांचे रिचार्ज केल्यावर एका सोप्या प्रश्नाचे उत्तर द्यावयाचे आहे. हे उत्तर बरोबर आले, तर लकी कॉन्टेस्टमध्ये ग्राहकांचा समावेश होणार आहे. यानंतर लकी ड्रॉ पद्धतीने दररोज एका ग्राहकाला टाटा टियागो जिंकण्याची संधी मिळणार आहे, असे सांगितले जात आहे. Tata Sky ची ही योजना ०६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत लागू असेल. यासंदर्भातील एक ट्विटही टाटा स्कायने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून केले आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी केवळ ५०० रुपयांचे रिजार्च करून लकी ड्ऱॉ स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहनही यानिमित्ताने करण्यात आले आहे. 

Tata Sky देशातील सर्वांत मोठी DTH सर्विस प्रोवाइडर कंपनी असून, टाटा स्काय रिचार्ज केल्यानंतर कार जिंका स्पर्धा नावाने सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेत ३० विजेत्यांना टियागो कार दिली जाणार आहे. या कारची सुरुवातीची किंमत ४.७० लाख रुपये आहे. ही स्पर्धा ८ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान चालणार आहे. 

दरम्यान, टाटा स्कायने ग्राहकांसाठी TATA SKY REFER & EARN स्कीम सुरू केली आहे.  या योजनेत ग्राहक आपल्या रेफरद्वारे मित्रमंडळींना टाटा स्काय कुटुंबासोबत जोडू शकतात. त्यात युजर्संना आणि त्यांच्या मित्रमंडळी दोघांनाही २०० रुपयांचे कॅशबॅक मिळू शकते. याशिवाय तुमच्या मित्रमंडळीना टाटा स्काय एचडी कनेक्शनवर स्पेशल डिस्काउंट ऑफर केला जात आहे. 

Web Title: recharge only 500 rupees of tata sky and get a tata tiago car in lucky draw contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.