शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Realme X7 आणि Realme X7 Pro 5G भारतात होणार लाँच; 'हे' असणार खास फीचर्स

By जयदीप दाभोळकर | Published: January 27, 2021 3:18 PM

पाहा काय आहेत तगडे स्पेसिफिकेशन्स

ठळक मुद्दे४ फेब्रुवारी रोजी स्मार्टफोन्स होणार भारतात लाँच५जी आणि अन्य जबरदस्त फीचर्ससह येणार हे फोन

स्मार्टफोन उत्पादन करणारी कंपनी रिअलमी भारतात आपल्या नेक्स्ट सीरिजचे स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी या फोनसंबंधी अनेक बाबी लीक झाल्या होत्या. तर काही टीझरही समोर आले होते. परंतु आता कंपनीनं Realme X7 आणि Realme X7 Pro 5G हे स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची तारीख निश्चित केली आहे. सध्या कंपनीनं भारतात हे फोन केव्हा लाँच केले जातील याची माहिती दिली आहे. परंतु याचा सेल केव्हापासून सुरू होईल याबाबत मात्र पुढील महिन्यातच माहिती देण्यात येणार आहे. मीडिया इनवाईट व्यतिरिक्त रियलमी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून Realme X7 आणि Realme X7 Pro 5G हे ४ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता भारतात लाँच केले जाणार असल्याची माहिती दिली.Realme X7 आणि Realme X7 Pro 5G  या दोन्ही स्मार्टफोन्ससाठई कंपनीनं आपल्या वेबसाईटवर निरनिराळे पेज तयार करण्यात आले आहेत. तसंच या फोनचे काही महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्सही समोर आले आहेत. Realme 7 5G मध्ये डायमेंसिटी 800U 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर 7nm प्रोरेसरवर बेस्ड आहेत. याव्यतिरिक्त या फोनचं वजन १७६ ग्राम असून यात १२० हर्ट्झचा ६.५ इंचाचा सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी या स्मार्टफोनमध्ये Mali G57 हा जीपीयू वापरण्यात आला आहे. बॅटरी क्षमतेबाबत सांगायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसंच हा फोन ३० वॉट सुपरडार्ट चार्ज सपोर्ट करेल. दरम्यान, हा फोन ६५ मिनिटांमध्ये फुल चार्ज होणार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून या ४८ मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा सेन्सर, याव्यतिरिक्त ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड अँगल आणि २ मेगापिक्सेलचा मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. Realme X7 Pro 5G स्पेसिफिकेशन्सRealme X7 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये ६,४ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यात 8nm बेस्ड क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G हा गेमिंग प्रोसेसर आहे. याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सेलचा इनडिस्प्ले सेल्फी कॅमेरा देण्यात आला असून मागील बाजूला सोनी ६४ मेगापिक्सेलसह क्वाड कॅमेरा सेटअपही देण्यात आलं आहे. तसंच हा मोबाईल 65W सुपर डार्ट चार्जिंगही सपोर्ट करणार असून हा मोबाईल ३४ मिनिटांत पूर्ण चार्ज होत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनIndiaभारत