जबरदस्त! 12 हजारांच्या आत Realme चा नवा 5G फोन, 5000mAh बॅटरीसह मोठा डिस्प्ले 

By सिद्धेश जाधव | Published: June 13, 2022 09:03 AM2022-06-13T09:03:58+5:302022-06-13T09:04:06+5:30

Realme V20 5G स्मार्टफोन चीनमध्ये कोणताही गाजावाजा न करता लाँच करण्यात आला आहे.  

Realme v20 5g smartphone launched with 5000mah battery check all details  | जबरदस्त! 12 हजारांच्या आत Realme चा नवा 5G फोन, 5000mAh बॅटरीसह मोठा डिस्प्ले 

जबरदस्त! 12 हजारांच्या आत Realme चा नवा 5G फोन, 5000mAh बॅटरीसह मोठा डिस्प्ले 

Next

Realme लागोपाठ अनेक स्मार्टफोन सादर करत आहे. कंपनी कमी किंमतीत जास्त फीचर्स देऊन रेडमीची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता Realme V20 5G स्मार्टफोन चीनमध्ये गुपचूप लाँच करण्यात आला आहे. हा फोन ऑफलाईन बाजारात विकला जाईल, यात 5000mAh ची मोठी बॅटरी, 4GB रॅम, 13MP कॅमेरा आणि अँड्रॉइड 11 ओएस देण्यात आला आहे.  

Realme V20 5G चे स्पेसिफिकेशन 

Realme V20 5G मध्ये 6.5 इंचाचा एचडी रिजोल्यूशन असलेला LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या टियरड्रॉप नॉच स्क्रीनचं रिजोल्यूशन 720x1600 पिक्सल इतकं आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 700 चिपसेट मिळतो. सोबत 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन जुन्या अँड्रॉइड 11 ओएसवर चालतो.   

फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 13-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 0.3-मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आहे. यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह डिवाइसमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरक्षा मिळते. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.  

Realme V20 5G ची किंमत 

Realme V20 5G स्मार्टफोनचा एकमेव व्हेरिएंट 999 युआन ) म्हणजे जवळपास 11,600 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. हा फोन स्टार ब्लू आणि इंक क्लाउड ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल. भारतात मात्र या नावानं हा हँडसेट येणार नाही.  

Web Title: Realme v20 5g smartphone launched with 5000mah battery check all details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.