ताप आलाय की नाही सांगणार नवीन स्मार्टवॉच; फक्त अडीच हजारांत वॉटरप्रूफ घड्याळ
By सिद्धेश जाधव | Updated: May 18, 2022 21:37 IST2022-05-18T21:37:15+5:302022-05-18T21:37:39+5:30
Realme Techlife Watch SZ100 स्मार्टवॉच हार्ट रेट, SpO2 मॉनिटर आणि बॉडी टेम्परेचर सेन्सरसह बाजारात आला आहे.

ताप आलाय की नाही सांगणार नवीन स्मार्टवॉच; फक्त अडीच हजारांत वॉटरप्रूफ घड्याळ
Realme नं भारतात Realme Narzo 50 5G सीरिजमध्ये दोन मिडरेंज स्मार्टफोन सादर केले आहेत. या इव्हेंटमधून Realme Techlife Watch SZ100 देखील बाजारात आला आहे. यात हार्ट रेट सेन्सर आणि SpO2 मॉनिटर इत्यादी हेल्थ फीचर्स मिळतात. यातील टेम्परेचर सेन्सर आणि वॉटर रेजिस्टन्स रेटिंग हे फीचर्स जास्त ग्राहकांना आकर्षित करतील.
हे वॉच लेक ब्लू आणि मॅजिक ग्रे कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. कंपनीनं हे वॉच भारतात 2499 रुपयांमध्ये सादर केला आहे. हे वॉच 22 मे दुपारी 12 वाजल्यापासून विकत घेता येईल. हे घड्याळास कंपनीच्या वेबसाईटसह अॅमेझॉन इंडियावरून देखील विकत घेता येईल.
Realme Techlife Watch SZ100 चे स्पेसिफिकेशन
वॉचमध्ये 240x280 पिक्सल रेजॉलूशनसह 1.69 इंचाचा कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 218ppi आणि 530 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. कस्टमायजेशनसाठी 110 पेक्षा जास्त वॉच फेस मिळतात. यात वॉकिंग, आउटडोर, रनिंग, सायकलिंग, फुटबॉल आणि योगसह 24 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. हार्ट रेट सेन्सर, बॉडी टेम्परेचर सेन्सर, स्लीप सेन्सर आणि SpO2 मॉनिटर तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवून असतात.
वॉच म्यूजिक-कॅमेरा कंट्रोल, स्टॉपवॉच, टायमर, अलार्म, वेदर, फाईंड फोन आणि फ्लॅश लाईट इत्यादी फीचर्ससह बाजारात आला आहे. या वॉचमधील IP68 रेटिंग याला मोठ्याप्रमाणावर डस्ट आणि वॉटरप्रूफ बनवते. वॉचमध्ये मिळणार बॅटरी सिंगल चार्जवर 12 दिवस वापरता येते, असा दावा कंपनीनं केला आहे.