Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 18:10 IST2025-08-20T18:09:20+5:302025-08-20T18:10:29+5:30

Realme P4 And Realme P4 Pro: स्मार्टफोन निर्माता कंपनी रिअलमीने त्यांचे दोन नवीन फोन रिअलमी P4 आणि रिअलमी P4 प्रो भारतात लॉन्च केले आहेत.

Realme P4, Realme P4 Pro smartphones with 7000 mAh battery, IP69+Ip68 rating launched in India: Price, specs and more | Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

स्मार्टफोन निर्माता कंपनी रिअलमीने त्यांचे दोन नवीन फोन रिअलमी P4 आणि रिअलमी P4 प्रो भारतात लाँच केले आहेत. हे दोन्ही फोन त्यांच्या दमदार वैशिष्ट्यांमुळे आणि परवडणाऱ्या किमतींमुळे चर्चेत आहेत. दोन्ही फोनमध्ये ड्युअल चिप वापरण्यात आली आहे. रिअलमीने खास भारतीय बाजारपेठेसाठी हे फोन तयार केले असून, ते ग्राहकांना चांगला परफॉर्मन्स आणि बॅटरी लाईफ देतील अशी अपेक्षा आहे.

रिअलमी P4 च्या ६ जीबी+ १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे आणि ८ जीबी+ २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत १७ हजार ९९९ रुपये आहे. रिअलमी P4 प्रो ८ जीबी +१२८ जीबी व्हेरिएंटची किमती १९ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होतात. तर, ८ जीबी+ २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे आणि १२ जीबी+२५६ जीबी व्हेरिएंटची किंमत २३ हजार ९९९ रुपये आहे. या किमतींमध्ये बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर्सचा समावेश आहे. हे फोन फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या वेबसाइटवरून खरेदी करता येईल. पहिला सेल २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सुरू होईल.

रिअलमी P4: फीचर्स

रियलमी पी४ ५जी मध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट १४४ हर्ट्झ आहे. ४५०० निट्सचा पीक ब्राइटनेस आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७४०० चिपसेट आहे. फोन अँड्रॉइड १५ वर आधारित Realme UI 6 वर चालतो. या फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा रिअर आणि ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा मिळत आहे. तर, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. फोनमध्ये ७ हजार एमएएच बॅटरी आहे, जी ८० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

रिअलमी P4 प्रो: फीचर्स

रिअलमी P4 प्रो मध्ये २८००×१२८० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.८ इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट १४४ हर्ट्झ आहे. हा एक OLED डिस्प्ले आहे जो ६५०० निट्सचा पीक ब्राइटनेस देतो. डिस्प्लेमध्ये गोरिल्ला ग्लास ७आय प्रोटेक्शन देखील आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन ४ चिपसेट आहे. हा फोन अँड्रॉइड १५ वर आधारित realme UI 6 वर चालतो. या फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह ५० मेगापिक्सेलचा रिअर आणि ८ मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा आहे. तर, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. १८९ ग्रॅम वजनाच्या या फोनमध्ये ७ हजार एमएएच बॅटरी आहे, जी ८० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन आयपी६८ आणि आयपी६९ रेटिंगसह येतो. त्यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Web Title: Realme P4, Realme P4 Pro smartphones with 7000 mAh battery, IP69+Ip68 rating launched in India: Price, specs and more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.