शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Motorola चा ताज हिसकावला; भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Realme Narzo 30 Pro लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 17:47 IST

Realme Narzo 30 Pro And Narzo 30A : Narzo 30 Pro हा भारतीय बाजारातील आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

नवी दिल्ली - Realme ने भारतात Narzo 30 सीरीज लाँच केली आहे. यामध्ये Narzo 30 Pro आणि Narzo 30A हे दोन फोन आणण्यात आले आहेत. Narzo 30 Pro हा भारतीय बाजारातील आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. MediaTek Dimensity 800U प्रोसेसरसह तो लाँच करण्यात आला आहे. यासोबतच व्हर्चुअल इव्हेंट दरम्यान कंपनीने आपले Buds Air 2 ईयरबड्स देखील लाँच केले आहेत. Narzo 30 Pro 5G च्या 6GB + 64GB वेरिएंची किंमत भारतात 16,999 रुपये आणि 8GB + 128GB वेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. 

चार मार्च रोजी दुपारी 12 याचा पहिला सेल असणार आहे. स्वोर्ड ब्लॅक आणि ब्लेड सिल्व्हर अशा दोन रंगामध्ये हा फोन उपलब्ध आहे. Narzo 30A च्या 3GB + 32GB वेरिएंटची किंमत 8,999 रुपये आणि 4GB + 64GB वेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. तो लेझर ब्लॅक आणि लेझर ब्लू अशा दोन रंगात उपलब्ध आहे. याचा सेल पाच मार्च रोजी दुपारी 12 वाजता असणार आहे. ऑफलाईन स्टोर्स, फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या अधिकृत वेबसाईटवरून ग्राहकांना याची खरेदी करता येणार आहे. Realme Narzo 30 Pro 5G खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI ट्रान्जॅक्शन्सवर 1,000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट देखील मिळणार आहे. 

Realme Narzo 30 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स 

डुअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेला हा फोन अँड्रॉईड 10 बेस्ड Realme UI वर चालतो. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटसोबत 6.5-इंच फुल-HD+ (1,080x2,400 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत LPDDR4X रॅमसोबत ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 800U प्रोसेसर देखील आहे. यामध्ये यातील 48 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, दुसरा 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि तिसरा 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरही आहे. तसेच, 30W डर्ट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5000mAh ची बॅटरीही मिळेल.

Realme Narzo 30A चे स्पेसिफिकेशन्स

डुअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेल्या हा स्मार्टफोन अँड्रॉईड 10 बेस्ड Realme UI वर चालतो. यामध्ये 6.5-इंच HD+ (720x1,600 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन 4GB पर्यंत LPDDR4X रॅमसोबत ऑक्टा-कोर MediaTek Helio G85 प्रोसेसर देखील आहे. मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा तर दुसरा मोनोक्रोम लेन्स सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. Realme Narzo 30A मध्ये कंपनीने 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 6000 mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Motorola चा डबल गेम; Xiaomi ला काही समजेना, आणखी एक स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच

Motorola ने सर्वात स्वस्त Motorola Moto G 5G स्मार्टफोन बाजारात आणून धुमाकूळ उडवून दिलेला असताना आता आणखी एक गेम खेळला आहे. यामुळे सर्वात स्वस्त स्मार्टफोन देणाऱ्या शाओमीला धक्का बसला आहे. शाओमीनेही ५जी फोन लाँच केला असा तरीही मोटरोलाची किंमत त्यांना ठेवता आलेली नाही. आता मोटरोलाने आणखी एक स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. मोटरोलाने फ्लॅगशिप स्मार्टफोन Motorola Edge चे छोटे रुप लाँच केले आहे. यामध्ये एकापेक्षा एक स्पेसिफिकेशन्स आहेत. 6 कॅमेरा, Qualcomm Snapdragon 870 Soc प्रोसेसर, 6.7 इंच LCD स्क्रीन आणि 90Hz डिस्प्ले रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले असा फोन चीनमध्ये 1999 युआन म्हणजेच 22,545 रुपयांत लाँच केला आहे. 

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

टॅग्स :realmeरियलमीtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोनMotorolaमोटोरोलाIndiaभारत