Realme ने सादर केला नवीन स्वस्त स्मार्ट टीव्ही; 32 इंचाचा Neo Smart TV भारतात लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: September 24, 2021 04:22 PM2021-09-24T16:22:48+5:302021-09-24T16:27:58+5:30

Budget Smart TV Realme Smart TV Neo: Realme Smart TV Neo मध्ये 32-इंचाचा डिस्प्ले आणि डॉल्बी ऑडिओसह ड्युअल स्पीकर देण्यात आले आहेत.  

Realme launches new entry level smart tv neo with 32 inch screen   | Realme ने सादर केला नवीन स्वस्त स्मार्ट टीव्ही; 32 इंचाचा Neo Smart TV भारतात लाँच 

Realme ने सादर केला नवीन स्वस्त स्मार्ट टीव्ही; 32 इंचाचा Neo Smart TV भारतात लाँच 

Next
ठळक मुद्देRealme Smart TV Neo मध्ये 32-इंचाचा डिस्प्ले आणि डॉल्बी ऑडिओसह ड्युअल स्पीकर देण्यात आले आहेत.  Realme Smart TV Neo ची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

Realme ने आपली नवीन बजेट स्मार्टफोन सीरिज Narzo 50 भारतात सादर केली आहे. याच लाँच इव्हेंटच्या माध्यमातून कंपनीने आपल्या स्मार्ट टीव्ही सीरिजचा विस्तार करत Realme Smart TV Neo सादर केली आहे. या टीव्हीमध्ये 32-इंचाचा डिस्प्ले आणि डॉल्बी ऑडिओसह ड्युअल स्पीकर देण्यात आले आहेत.  

Realme Smart TV Neo ची किंमत  

Realme Smart TV Neo ची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या टीव्हीची विक्री 3 ऑक्टोबरपासून सुरु होईल. हा नवीन स्मार्टटीव्ही कंपनीच्या वेबसाईटसह फ्लिपकार्ट आणि ऑफलाईन रिटेलर्स स्टोर्सवरून विकत घेता येईल.  

Realme Smart TV Neo चे स्पेसिफिकेशन्स  

Realme Smart TV Neo मध्ये बेजल लेस डिजाईनसह 32-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डॉल्बी ऑडिओ सपोर्ट असलेले ड्युअल स्पीकर देण्यात आले आहे, जे 20W आऊटपुट देतात. तसेच यात मीडियाटेकचा 64बिट क्वॉड कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्ट टीव्हीचा सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी डिस्प्ले क्रोमा बूस्टसह सादर करण्यात आला आहे.  

कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्ट टीव्हीमध्ये 2.4GHz Wi-Fi, दोन HDMI पोर्ट, एक USB पोर्ट आणि एक LAN पोर्ट देण्यात आला आहे. यात YouTube 2021 आणि इतर मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स बिल्टइन मिळतात. Realme Smart TV Neo मधील CC Cast च्या मदतीने युजर्स आपल्या स्मार्टफोनवरील कंटेन्ट टीव्हीवर बघू शकतील.  

Web Title: Realme launches new entry level smart tv neo with 32 inch screen  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app