रिअलमीचा धमाका! ७०००mAh बॅटरीसह Realme Narzo 90 सिरीज भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:25 IST2025-12-16T15:16:39+5:302025-12-16T15:25:43+5:30
Realme Narzo 90 Series: रिअलमीची नवीन नार्झो ९० सीरिज भारतीय बाजारात लॉन्च झाली आहे.

रिअलमीचा धमाका! ७०००mAh बॅटरीसह Realme Narzo 90 सिरीज भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत
स्मार्टफोन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रिअलमी कंपनीने आज भारतीय बाजारात आपली बहुप्रतिक्षित रिअलमी नार्झो ९० सिरीज अधिकृतपणे लॉन्च केली. या सिरीजमध्ये नार्झो ९० 5G आणि नार्झो ९० एक्स 5G या दोन दमदार स्मार्टफोनचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही फोन्समध्ये ७००० एमएएची 'टायटन' बॅटरी देण्यात आली आहे.
दोन्ही स्मार्टफोन २४ डिसेंबरपासून अमेझॉन आणि रिअलमी इंडियाच्या ऑनलाइन स्टोअरवर भारतात विक्रीसाठी उपलब्ध असतील.रिअलमी नार्झो ९० ५जी व्हिक्टरी गोल्ड आणि कार्बन ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध आहे, तर नार्झो ९० एक्स ५जी नायट्रो ब्लू आणि फ्लॅश ब्लू रंगांमध्ये उपलब्ध असेल.
रिअलमी नार्झो ९० च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत १६ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. तर, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत १८ हजार ४९९ रुपये इतकी आहे. रिअलमी नार्झो ९० एक्स (६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज) स्मार्टफोनची सुरुवाती किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत १५ हजार ४९९ रुपये इतकी आहे.
रिअलमी नार्झो ९० आणि रिअलमी नार्झो ९० एक्स हे ड्युअल-सिम हँडसेट आहेत, जे अँड्राईड १५ वर आधारित रिअलमी यूआय ६.० वर चालतात. स्टँडर्ड मॉडेलमध्ये ६.५७ इंचाचा AMOLED फुल-एचडी+ डिस्प्ले मिळत आहे. तर, रिअलमी नार्झो ९० एक्समध्ये ६.८० इंचाची एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. रिअलमी नार्झो ९० ग्राहकांना ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. दुसरीकडे, रिअलमी नार्झो ९० एक्समध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतोय. दोन्ही स्मार्टफोनमध्ये ७००० एमएएचची बॅटरी आहे. त्यामुळे ग्राहकांना आपला फोन दीर्घकाळ वापरता येणार आहे.