Realme च्या दमदार स्मार्टफोनवर मिळणार 5,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट; अशी आहे ऑफर 

By सिद्धेश जाधव | Published: September 28, 2021 12:30 PM2021-09-28T12:30:35+5:302021-09-28T12:30:41+5:30

Realme GT Master Edition Discount offer: Realme GT Master Edition स्मार्टफोनवर Realme Festive Days सेलमध्ये 5,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जाणार आहे.

Realme gt master edition will get a discount of up to rs 5000 during realme festival sale  | Realme च्या दमदार स्मार्टफोनवर मिळणार 5,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट; अशी आहे ऑफर 

Realme च्या दमदार स्मार्टफोनवर मिळणार 5,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट; अशी आहे ऑफर 

Next

रियलमीने आपल्या ‘GT’ सीरिज अंतर्गत Realme GT आणि Realme GT Master Edition असे दोन स्मार्टफोन गेल्याच महिन्यात भारतात सादर केले आहेत. आता या सीरिजमधील मास्टर एडिशनवर कंपनीने डिस्काउंटची घोषणा केली आहे. सेलदरम्यान Realme GT Master Edition स्मार्टफोनवर 5,000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येईल.  

Realme GT Master Edition स्मार्टफोनवर Realme Festive Days सेलमध्ये 5,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जाणार आहे. रियलमी फेस्टिव्हल डेज सेल 3 ऑक्टोबरपासून सुरु होईल आणि 10 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहील. या सेलदरम्यान हा फोन Flipkart आणि Realme Online Store किंवा रिटेल स्टोरवरून विकत घेतल्यास ग्राहकांना 5,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. 

Realme GT Master Edition ची सेलमधील किंमत 

Realme GT Master Edition स्मार्टफोनचा 25,999 रुपयांमध्ये मिळणार 6GB/128GB स्टोरेजव्हेरिएंट सेलमध्ये 20,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 8GB/128GB स्टोरेज व्हेरिएंट 22,999 रुपयांमध्ये आणि 8GB/256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 24,999 रुपये मोजावे लागतील.  

Realme GT Master Edition चे स्पेसिफिकेशन्स   

Realme GT Master Edition मध्ये 6.43 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या रियलमी स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा मिडरेंज Snapdragon 778G 5G चिपसेट मिळतो. या फोनमध्ये 8GB पर्यंतचा रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. एक्सटेंडेड रॅम फिचरच्या मदतीने फोनचा रॅम 5GB पर्यंत वाढवता येतो. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआयवर चालतो. 

फोटोग्राफीसाठी Realme GT Master Edition ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 64MP चा मुख्य कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर मिळतो. हा फोन 32MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Realme GT Master Edition मध्ये 4300mAh ची बॅटरी 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते. चार्ज काला सपोर्ट दिला आहे.   

Web Title: Realme gt master edition will get a discount of up to rs 5000 during realme festival sale 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app