दमदार डॉल्बी ऑडियोसह आले Realme चे इयरबड्स; सिंगल चार्जवर 30 तास ऐका म्युजिक 

By सिद्धेश जाधव | Updated: March 3, 2022 19:19 IST2022-03-03T19:18:14+5:302022-03-03T19:19:04+5:30

Realme Buds Q2s: दमदार साऊंडसाठी कंपनीनं 10mm ड्रायव्हर्सचा वापर केला आहे. यात डॉल्बी अ‍ॅटमॉसचा सपोर्ट मिळतो.

Realme Buds Q2s Launched Know Features And Specifications  | दमदार डॉल्बी ऑडियोसह आले Realme चे इयरबड्स; सिंगल चार्जवर 30 तास ऐका म्युजिक 

दमदार डॉल्बी ऑडियोसह आले Realme चे इयरबड्स; सिंगल चार्जवर 30 तास ऐका म्युजिक 

Realme नं आपला इयरबड्सचा पोर्टफोलियो वाढवला आहे. कंपनीनं चीनमध्ये नवीन Realme Buds Q2s लाँच केले आहेत. यात डॉल्बी अ‍ॅटमॉस साऊंड आणि 30 तासांपर्यंत बॅटरी लाईफ मिळते. चीनमध्ये या नवीन बड्स की किंमत 199 युआन (सुमारे 2400 रुपये) ठेवण्यात आली आहे. कंपनी हे बड्स लवकरच भारतात देखील लाँच करू शकते.  

स्पेसिफिकेशन्स 

रियलमीचे हे बड्स ट्रान्सपॅरेंट केससह सादर करण्यात आला आहे. या बड्सचे इंटरस्टेलर ब्लॅक, फॉरेस्ट आणि पेपर, असे तीन कलर व्हेरिएंट आले आहेत. दमदार साऊंडसाठी कंपनीनं 10mm ड्रायव्हर्सचा वापर केला आहे. यात डॉल्बी अ‍ॅटमॉसचा सपोर्ट मिळतो. यातील IPX4 स्प्लॅशप्रूफ रेटिंग पाण्याच्या शिंतोड्यांपासून संरक्षण करते.  

Realme Buds Q2s बड्स मध्ये टच जेस्चर कंट्रोल मिळतात. यातील ब्लूटूथ 5.2 ची कनेक्टिव्हिटी 10 मीटर पर्यंतची रेंज देते. या बड्समध्ये AAC आणि SBC ऑडियो कोडॅक सपोर्ट मिळतो. सोबत अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन आणि ENC फीचर देखील आहे. गेमर्ससाठी यात लो-लेटेंसी गेमिंग मोड आहे. हे बड्स सिंगल चार्जवर 7 तास वापरता येतात. तर चार्जिंग केससह हा बॅटरी बॅकअप 30 तासांपर्यंत वाढवता येतो.  

हे देखील वाचा:

 

Web Title: Realme Buds Q2s Launched Know Features And Specifications