शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

रियलमीच्या पहिल्या लॅपटॉपच्या किंमतीचा खुलासा; Realme Book Slim देणार का Mi Notebook ला टक्कर 

By सिद्धेश जाधव | Updated: August 16, 2021 19:12 IST

Realme Book (Slim) price: ट्वीटर युजर @TechTipster_ ने रियलमीच्या पहिल्या लॅपटॉपचा पोस्टर शेयर केला आहे. या पोस्टरमधून या लॅपटॉपच्या किंमतीचा खुलासा झाला आहे.  

शाओमी, विवो आणि रियलमी या स्मार्टफोन निर्माता कंपन्या सध्या लॅपटॉप सेगमेंटकडे वळत आहेत. लवकरच रियलमीचा Realme Book (Slim) लॅपटॉप बाजारात येणार आहे. हा लॅपटॉप सर्वात आधी चीनमध्ये लाँच केला जाईल. त्यानंतर भारतात देखील रियलमीचा पहिला लॅपटॉप सादर केला जाणार आहे. आता रियलमीच्या या आगामी लॅपटॉपचा टीजर पोस्टर लीक झाला आहे. ट्वीटर युजर @TechTipster_ ने रियलमीच्या पहिल्या लॅपटॉपचा पोस्टर शेयर केला आहे. या पोस्टरमधून या लॅपटॉपच्या किंमतीचा खुलासा झाला आहे.  

Realme Book (Slim) लॅपटॉपची लीक किंमत 

टिप्सटरने दिलेल्या माहितीनुसार Realme Book (Slim) लॅपटॉप चीनमध्ये 4,699CNY (सुमारे 54,000 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो. भारतात या लॅपटॉपची किंमत 55 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. Realme Book (Slim) मध्ये 14-इंचाचा 2K WQHD डिस्प्ले 3:2 अस्पेक्ट रेश्योसह देण्यात येईल. रियलमी लॅपटॉपमध्ये कंपनी 11th Gen Intel Core i5-1135G7 प्रोसेसर देणार आहे. त्याचबरोबर 16GB DDR4 रॅम, 512GB SSD स्टोरेज आणि 11 तास बॅटरी बॅकअप मिळू शकतो.  

Realme Book लाँच डेट   

Realme Book लॅपटॉप चीनमध्ये Realme 828 Fan Festival इव्हेंट दरम्यान सादर केला जाईल. या लॅपटॉपसोबत कंपनी एक टॅबलेट देखील लाँच करू शकते, जो Realme Pad नावाने बाजारात येईल. Realme Pad टॅबलेट कंपनीच्या लॅपटॉप रियलमी बुकसोबतच 18 ऑगस्टला सादर होईल कि नाही हे अजून स्पष्ट झाले नाही.   

टॅग्स :realmeरियलमीlaptopलॅपटॉप