शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

भारतातील सर्वात स्वस्त Realme 8 5G चा पहिला सेल सुरू; पण आपण घेऊ शकत नाही...वाचा कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 1:36 PM

Realme 8 5G to go on first sale today, Check price, Specifications : फ्लिपकार्ट आणि realme.com वर विक्री सुरू झाली आहे. हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

नवी दिल्ली - भारतातील सर्वात स्वस्त Realme 8 5G चा पहिला सेल सुरू झाला आहे. दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट आणि realme.com वर विक्री सुरू झाली आहे. हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 4 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेजमध्ये हा फोन उपलब्ध आहे. फोनच्या 4 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. तसेच 8 जीबी रॅम व्हेरियंटची किंमत 16,999 रुपये आहे. मात्र महाराष्ट्रातील नागरिकांना हा फोन सध्या घेता येणार नाही. कारण तो सध्या महाराष्ट्रात Not Deliverable आहे. त्यामुळे नागरिकांना हा फोन घेण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. 

आजच्या सेलमध्ये एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 10 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल. याशिवाय फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना 5  टक्के अनलिमिटेड कॅशबॅकचा फायदा होणार आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेतल्यास 15,650 रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच दरम्यान फक्त इसेन्शिअल सर्व्हिसचीच डिलीव्हरी होत आहे. त्यामुळे भारतातील सर्वात स्वस्त Realme 8 5G चा पहिला सेल सुरू झाला असला तरी तो महाराष्ट्रातील नागरिकांना घेता येणार नाही. 

फोनमध्ये 1080x2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे. डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 20: 9 च्या आस्पेक्ट रेशोसह येतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी ड्रॅगन्ट्रेइल ग्लास वापरला गेला आहे. या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून मीडियाटेक डायमेन्शन 700 एसओसी देण्यात आला आहे ज्यामध्ये 8 जीबी पर्यंत LPDDR4x रॅम आणि यूएफएस 2.1 स्टोरेज 128 जीबी आहेत. फोनचे वैशिष्ट्य म्हणजे ते डीआरई तंत्रज्ञानासह आहे जे अतिरीक्त स्टोरेजला उत्कृष्ट अनुभवासाठी व्हर्च्युअल रॅममध्ये रूपांतरित करतं. 

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 48-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्ससह 2-मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 16-मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 18W फास्ट चार्जिंगसह 5000mAh देण्यात आली आहे. ड्युअल नॅनो सिमला सपोर्ट करणारा हा फोन अँड्रॉईड 11 वर आधारीत Realme UI 2.0 वर कार्य करतो.

Realme 8 5G स्पेसिफिकेशन्स

परफॉर्मेंस - MediaTek Dimensity 700 MT6833डिस्प्ले - 6.5 inches (16.51 cm)स्टोरेज    - 128 GBकॅमेरा - 48 MP + 2 MP + 2 MPबॅटरी - 5000 mAhPrice in india -    16999रॅम - 4 GB

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

टॅग्स :realmeरियलमीtechnologyतंत्रज्ञानIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रSmartphoneस्मार्टफोन