7000mAh बॅटरी अन् सेल्फी मिररसह दमदार स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 20:25 IST2026-04-06T20:24:44+5:302026-04-06T20:25:24+5:30

सेल्फी मिरर फीचर असलेला भारतातील पहिलाच स्मार्टफोन!

Realme 16 5G smartphone with 7000mAh battery and selfie mirror launched in India; Know the price | 7000mAh बॅटरी अन् सेल्फी मिररसह दमदार स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत...

7000mAh बॅटरी अन् सेल्फी मिररसह दमदार स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत...

लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी Realme ने आपला नवीन Realme 16 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये तब्बल 7000mAh ची मोठी बॅटरी, 50MP कॅमेरा, MediaTek Dimensity चिपसेट आणि खास सेल्फी मिरर फीचर देण्यात आले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, भारतात सेल्फी मिरर फीचर असलेला हा पहिलाच स्मार्टफोन आहे.

सेल्फी मिरर फीचर म्हणजे काय?

या फोनच्या बॅक पॅनलवर कॅमेऱ्याजवळ एक छोटा मिरर दिला आहे. यामुळे यूजर्सना रियर कॅमेऱ्याने फोटो किंवा व्हिडिओ काढताना स्वतःचे रिफ्लेक्शन दिसते आणि रियर कॅमेऱ्यानेच सेल्फी घेता येते. हे फीचर विशेषतः व्लॉगिंग आणि व्हिडिओ क्रिएटर्स साठी उपयुक्त मानले जात आहे.

किंमत आणि व्हेरिएंट

Realme 16 5G तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे:

व्हेरिएंटकिंमत
8GB RAM + 128GB स्टोरेज₹31,999
8GB RAM + 256GB स्टोरेज₹33,999
12GB RAM + 256GB स्टोरेज₹36,999

या फोनची पहिली सेल 5 एप्रिलपासून सुरू झाली असून, Flipkart आणि Realme ऑनलाइन स्टोअरवरून खरेदी करता येईल. हा फोन Air Black आणि Air White अशा दोन कलर ऑप्शनसह लॉन्च केला आहे.

Realme 16 5G चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले आणि सॉफ्टवेअर
6.57 इंच Full HD+ AMOLED डिस्प्ले
120Hz रिफ्रेश रेट
93% स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो
Android 16 आधारित Realme UI 7.0
3 वर्ष OS अपडेट
4 वर्ष सुरक्षा अपडेट

प्रोसेसर आणि स्टोरेज
MediaTek Dimensity 6400 Turbo चिपसेट
12GB LPDDR4x RAM
256GB UFS 2.2 स्टोरेज
हीट डिसिपेशन सिस्टम (फोन तापमान नियंत्रणासाठी)

कॅमेरा सेटअप
50MP मेन रियर कॅमेरा
2MP मोनोक्रोम सेन्सर
सेल्फी मिरर फीचर
रियर कॅमेऱ्याने सेल्फी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग शक्य

बॅटरी आणि चार्जिंग
7000mAh बॅटरी
60W फास्ट चार्जिंग
सिंगल चार्जवर 142 तास म्युझिक प्लेबॅक
मोठी बॅटरी असल्यामुळे हा फोन हेवी यूजर्स, गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्यासाठी चांगला पर्याय मानला जात आहे.

Web Title : 7000mAh बैटरी और सेल्फी मिरर के साथ Realme 16 5G भारत में लॉन्च

Web Summary : Realme ने भारत में 7000mAh बैटरी, 50MP कैमरा और सेल्फी मिरर के साथ Realme 16 5G लॉन्च किया। कीमत ₹31,999 से शुरू। इसमें MediaTek Dimensity चिपसेट है और यह Flipkart और Realme स्टोर पर उपलब्ध है।

Web Title : Realme 16 5G launched in India with 7000mAh battery, selfie mirror

Web Summary : Realme launched its 16 5G in India, featuring a 7000mAh battery, 50MP camera, and a unique selfie mirror. Prices start at ₹31,999. It has MediaTek Dimensity chipset and is available on Flipkart and Realme store.