शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

PUBG MOBILE: १८ मेपासून सुरु होणार Battlegrounds Mobile India चं रजिस्ट्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 17:23 IST

PUBG India : या गेमसाठी कंपनीनं घातल्या आहेत काही अटी. Battlegrounds Mobile India हा गेम केवळ भारतातच अॅक्सेस करता येणार.

ठळक मुद्देया गेमसाठी कंपनीनं घातल्या आहेत काही अटी. Battlegrounds Mobile India हा गेम केवळ भारतातच अॅक्सेस करता येणार.

काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारनं सुरक्षेच्या कारणास्तव PUBG या गेमवर बंदी घातली होती. परंतु आता पुन्हा एकदा हा गेम भारतात पुनरागमनाच्या तयारीत आहे. Battlegrounds Mobile India या नावानं हा गेम पुन्हा भारतीय चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. कंपनीनं नुकतंच पबजी मोबाईल इंडियाच्या सर्व सोशल मीडिया पेजेसचं नाव बदललं आहे आणि कंपनीनं आता रजिस्ट्रेशनचीही घोषणा केली आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार १८ मे पासून गुगल प्ले स्टोअरवर Battlegrounds Mobile India साठी रजिस्ट्रेशनला सुरूवात करण्यात येणार आहे. त्यानंतर हा गेम लाँच करण्यात येईल. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ११८ अन्य अॅप्ससह केंद्र सरकारनं पबजीवर भारतात बंदी धातली होती. दरम्यान, रजिस्ट्रेशन केलं तरी हा गेम केव्हा लाईव्ह केला जाईल याची कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. तसंच iOS बाबतही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. चाहत्यांसाठी यामध्ये अनेक रिवटर्ड्स ठेवले जाती. तसंच प्री रजिस्टर केल्यासच त्यांना त्याचा फायदा मिळेल. हे रिवॉर्ड्स केवळ भारतीयांसाठीच असतील, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. प्री रजिस्टर करणाऱ्या युझर्सना गुगल स्टोअरवर जावं लागेल आणि त्यानंतर प्री रजिस्टर बटनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर गेम लाँच झाल्यावर रिवॉर्ड्स क्लेम केले जाऊ शकतात. हा गेम मोफत उपलब्ध असणार आहे. 

सुरक्षेची घेणार काळजीगेमर्सचा डेटा कोणत्याही ठिकाणी पाठवला जाणार नाही आणि तो पूर्णपणे सुरक्षित असेल. कंरनी सरकारच्या सर्व गाईडलाईन्सचं पालन करेल. यामध्ये प्रायव्हसी आणि युझर्सच्या सिक्युरिटीचा समावेश असेल, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. ज्या युझर्सचं वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना आपल्या आई-वडिलांचा संपर्क क्रमांक द्यावा लागेल. त्यांच्या फोन क्रमांकाशिवाय तुम्ही साईनअप प्रोसेस करू शकणार नाही. त्यांच्या परवानगीनंतरच १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हा गेम खेळता येईल असं क्रॉफ्टननं आपल्या प्रायव्हसी पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमIndiaभारतgoogleगुगल