Pubg Mobile India चा नवा पोस्टर व्हायरल; भारतवापसीसाठी नावच बदलले?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 03:16 PM2021-05-03T15:16:47+5:302021-05-03T15:19:05+5:30

Pubg Mobile India name change: नव्या वृत्तानुसार PUBG Mobile India च्या नवीन नावाचा खुलासा झाला आहे. Krafton कोणत्याही परिस्थितीत हा गेम भारतात आणू इच्छित आहे. यासाठी ती नावही बदलण्यासाठी तयार आहे.

Pubg Mobile India's new poster goes viral; Name changed to Battlegrounds Mobile India for reentry | Pubg Mobile India चा नवा पोस्टर व्हायरल; भारतवापसीसाठी नावच बदलले?

Pubg Mobile India चा नवा पोस्टर व्हायरल; भारतवापसीसाठी नावच बदलले?

googlenewsNext

चीनसोबतच्या गलवान घाटीतील तणावामध्ये चिनी अ‍ॅप्सवर गंडांतर आले होते. भारताने चिनी गेम्ससह अन्य अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. याचा मोठा फटका या अ‍ॅपच्या कंपन्यांना बसला होता. यानंतर काही काळाने तणाव काहीसा निवळल्यानंतर पब्जी गेम (PUBG Mobile India) भारतात येणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, अद्याप हा गेम आलेला नाही. तरीही अधून मधून त्याच्या बातम्या, फोटो व्हायरल होत आहेत.


नव्या वृत्तानुसार PUBG Mobile India च्या नवीन नावाचा खुलासा झाला आहे. पब्जी मोबाईल इंडियाचे नवीन नाव Battlegrounds Mobile India असे असणार आहे. याचा एक पोस्टरही लीक झाला आहे. या पोस्टरमध्ये दाखविण्यात ाले आहे की, एक प्लेअर मिरामारमध्ये लँड करत आहे. या पोस्टरमध्ये प्लेअर Miramar मध्ये लँड करत असताना Battlegrounds Mobile India ला पाहत आहे. हा गेम Krafton Inc डिस्ट्रीब्यूट करणार आहे. PUBG Mobile कोअर गेम एक्सपिरिअन्स यामध्ये असण्याचे सांगितले जात आहे. (new creative poster suggests that the game developers have decided to change the name of PUBG Mobile India.)

हे लीक झालेले पोस्टर GemWire कडून आले आहे. लीकमध्ये नवीन पोस्टर आणि गेमच्या नावाबाबत सांगण्यात आले आहे. ही माहिती PUBG Mobile India च्या वेबसाईटवरून काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. कंपनीने battlergroundsmobileindia.in हे डोमेनही रजिस्टर केले आहे. या नव्या डोमेनचे रजिस्ट्रेशन 7 एप्रिलला Krafton ने केले आहे. याचा एक नवीन टीजर व्हिडीओ India Recall Campaign Motion_v02.mp4 नावाने आला आहे. लीकनुसार PUBG Mobile चे नवीन नाव Battlegrounds Mobile India असण्याची शक्यता आहे. 


हे पोस्टर Vimeo वर असलेल्या एका व्हिडीओमध्ये embedded लिंक मध्ये आहे. GGWire च्या इन्स्टाग्राम पोस्टनुसार या थंबनेलसोबत दुसरा व्हिडीओ त्यांनी प्रायव्हेट ठेवला आहे. असे वाटतेय की Krafton कोणत्याही परिस्थितीत हा गेम भारतात आणू इच्छित आहे. यासाठी ती नावही बदलण्यासाठी तयार आहे.

Web Title: Pubg Mobile India's new poster goes viral; Name changed to Battlegrounds Mobile India for reentry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.