शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

FAUG गेमसाठी प्री रजिस्ट्रेशन सुरू, अधिक माहितीसाठी जाणून घ्या...

By ravalnath.patil | Published: November 30, 2020 9:37 PM

FAUG : अद्याप हा गेम लाँच झाला नाही आणि यातच आता PUBG MOBILE INDIAच्या कमबॅकच्या बातम्या येत आहेत.

ठळक मुद्देFauG गुगल प्ले स्टोअरवर प्री रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहे. तसेच, यामध्ये काही गेम प्ले फोटो आहेत, ज्यावरून या गेमची थीम काय असणार आहे, याची कल्पना येत आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने भारतात PUBG Mobile गेमिंग अॅपवर बंदी घातल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने FAUG (Fearless and United Guards) नावाच्या गेमचा टीझर शेअर केला. हा गेम nCore गेमिंगने डेव्हलप केला आहे. अद्याप हा गेम लाँच झाला नाही आणि यातच आता PUBG MOBILE INDIAच्या कमबॅकच्या बातम्या येत आहेत.

दरम्यान, FauG साठी गुगल प्ले स्टोअरवर प्री रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. याआधी गुगल प्ले स्टोअरवरून नावाची अनेक बनावट अॅप्स देखील हटवण्यात आली आहेत. FauG गुगल प्ले स्टोअरवर प्री रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहे. तसेच, यामध्ये काही गेम प्ले फोटो आहेत, ज्यावरून या गेमची थीम काय असणार आहे, याची कल्पना येत आहे. याआधी या गेमचा एक व्हिडिओ ट्रेलरही आला होता ज्यामध्ये भारत-चीन सीमेवर चिनी सैनिकांसोबत झालेला तणाव दाखविण्यात आल्याचे म्हटले जात होते.

गुगल प्ले स्टोअरवर अपलोड केलेल्या अनेक फोटोंमध्ये सैनिक एकमेकांशी लढताना दिसत आहेत. डोंगराळ प्रदेश आहे आणि लढाई हातांनी होत असल्याचे दिसत आहे. यासाठी सैनिकांच्या हातात शस्त्रेही आहेत. या गेममध्ये अनेक लेव्हल आणि टास्क असतील आणि हा खेळ भारताच्या उत्तर सीमेवर गेम प्ले होईल. या गेमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले आहे की,  FauGकमांडो धोकादायक सीमावर्ती भागात गस्त घालत आहेत आणि ते भारताच्या शत्रूंबरोबर युद्ध करतील.

प्री रजिस्टर कसे करावे?प्री रजिस्टर करणे सोपे आहे. कंपनीने म्हटले आहे की,  गेम खेळण्यासाठी आधी तुम्हाला प्री रजिस्टर करावे लागेल. यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोअरमध्ये FauG लिहून शोधू शकता. येथे तुम्हाला FauGसाठी प्री रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिसेल. याठिकाणी तुम्हाला टॅप करावा लागेल. यानंतर तुमची प्री रजिस्ट्रेशन केली जाईल. nCore कडून अद्याप गेम कधी लाँच करण्यात येईल आणि कधी आयओएसवर येईल, हे सांगण्यात आले नाही. कारण सध्या या गेमचे प्री रजिस्ट्रेशन अँड्रॉइडच्या गुगल प्ले स्टोअरवर केले जात आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानPUBG Gameपबजी गेम