PUBG 2: पबजीच्या नवीन व्हर्जनवर काम सुरु; BGMI Lite चा देखील झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 17:40 IST2021-10-11T17:39:58+5:302021-10-11T17:40:51+5:30
PUBG गेमचं नवीन व्हर्जन लवकरच सादर केला जाऊ शकतं. कंपनी लवकरच या आगामी गेमची घोषणा करू शकते. तसेच भारतीय PUBG Mobile Lite चे भारतीय व्हर्जन देखील लवकरच येऊ शकते.

PUBG 2: पबजीच्या नवीन व्हर्जनवर काम सुरु; BGMI Lite चा देखील झाला खुलासा
Krafton लवकरच PUBG (Player’s Unknown Battlegrounds) चं सीक्वल म्हणजे दुसरं एडिशन लवकरच लाँच करू शकते. Krafton ने आतापर्यंत PUBG हा एक बॅटल रॉयल गेम सादर केला आहे. या गेमचे PC, कंसोल आणि मोबाईल व्हर्जन उपलब्ध आहेत. या मोबाईल व्हर्जनचे देखील देशांनुसार अनेक व्हर्जन्स उपलब्ध आहेत.
तसेच कंपनीने PUBG: New State देखील जागतिक बाजारात सादर केला आहे, ज्यात अॅ़डवांस आणि नेक्स्ट जेनरेशन गेमिंग एक्सपीरियंस मिळतो. आता PlayerIGN ने एक माहिती लीक केली आहे, त्यानुसार कंपनी एक टेक्नीकल आर्ट डायरेक्टर आणि एक टेक्नीकल अॅनीमेटर एका निनावी प्रोजेक्टसाठी कामावर ठेवत आहे. हा नवीन प्रोजेक्ट Epic Games च्या Unreal Engine 5 वर आधारित असेल. लीकनुसार, हाच PUBG चा सीक्वल असेल. हा काही जुन्या गेमचा अपडेट नसून एक नवीन प्रोजेक्ट असेल.
BGMI Lite येत आहे
PUBG mobile वर जेव्हा भारतात बंदी घालण्यात आली तेव्हा PUBG mobile Lite वर देखील बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर क्रॉफ्टनने BGMI म्हणजे Battleground Mobile India हा गेमचा भारतीय व्हर्जन सादर केला. परंतु या गेमचा लाईट व्हर्जन मात्र भारतीय गेमर्सना मिळाला नाही. त्यामुळे जुने आणि लो रॅम असलेले फोन वापरणाऱ्या गेमर्समध्ये नाराजी होती. स्पोर्ट्सकिडाने दिलेल्या बातमीनुसार क्रॉफ्टन BGMI Lite वर काम करत आहे आणि हा गेम उशिरा लाँच होऊ शकतो. ही माहिती वेबसाईटने गेमर्सच्या हवाल्याने दिली आहे.