Galaxy S21 चं भारतात प्री-बुकिंग सुरू; ग्राहकांना मिळणार 'ही' ऑफर

By जयदीप दाभोळकर | Published: January 8, 2021 01:08 PM2021-01-08T13:08:55+5:302021-01-08T13:12:26+5:30

प्री-बुक केल्यास ग्राहकांना व्हीआयपी पाससह मिळणार एक ऑफर

Pre reserve a samsung Galaxy S21 in India get a free cover customer will get vip pass too | Galaxy S21 चं भारतात प्री-बुकिंग सुरू; ग्राहकांना मिळणार 'ही' ऑफर

Galaxy S21 चं भारतात प्री-बुकिंग सुरू; ग्राहकांना मिळणार 'ही' ऑफर

googlenewsNext
ठळक मुद्देग्राहकांना २ हजार रूपये भरून स्मार्टफोन प्री-बुक करता येणारसॅमसंग इंडिया ई-स्टोअर आणि सॅमसंग शॉप अॅपद्वारे स्मार्टफोन बुक करण्याची संधी

दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंगनं भारतात आपल्या नव्या Galaxy फ्लॅगशिप स्मार्टफोनसाठी नोंदणी करण्यास सुरूवात केली आहे. सॅमसंगनं दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना २ हजार रूपये भरून त्यांचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन बुक करता येणार आहे. आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन ग्राहकांना सॅमसंग इंडिया ई-स्टोअर आणि सॅमसंग शॉप अॅपद्वारे बुक करता येणार आहे. 

प्री बुक करणाऱ्या ग्राहकांना कंपनी  Next Galaxy VIP Pass देणार आहे. फोन खरेदी करताना प्री बुक करते वेळी देण्यात आलेलेल २ हजार रूपयेदेखील वजा करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त जे ग्राहक Galaxy फ्लॅगशिप म्हणजे Galaxy S21 प्री बुक करतील त्यांना ३,८४९ रूपये किंमतीचं एक कव्हर मोफत दिलं जाणार आहे. सॅमसंगनं दिलेल्या माहितीनुसार Galaxy फ्लॅगशिपसाठी प्री बुकिंग १४ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. 

सॅमसंग आपला पुढील फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात कंपनीनं काही टिझरही जारी केले आहेत. Galaxy S21 चे काही फोटो आणि स्पेसिफिकेशन्सही लीक झाले होते. यावरून ग्राहकांना या फोनमध्ये काय खास असेल याची कल्पना आली आहे. 

Galaxy S21च्या डिझाईनमध्येही Galaxy S20 च्या तुलनेत बदल पाहायला मिळणार आहे. विषेशत: Galaxy S21 सीरिजचं कॅमेरा मॉड्यूल हे वेगळं असणार आहे. तसंच यावेळी मोबाईलमध्ये काही नवे सेन्सर्सही पाहायला मिळतील. प्रोसेसरबाबत सांगायचं झाल्यास Galaxy S21 सीरिजमध्ये Qualcomm Snapdragon 888 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. परंतु कंपनी भारतातील आपल्या फ्लॅगशिप फोनमध्ये इनहाऊस  Exynos प्रोसेसर देते.

Web Title: Pre reserve a samsung Galaxy S21 in India get a free cover customer will get vip pass too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.