शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

Prajwal Chougule: लय भारी! कोल्हापूरकराच्या जाळ्यात Apple अडकली; प्रज्वलने फोटोग्राफी स्पर्धा जिंकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 16:13 IST

कोल्हापूरकराचा नाद लय भारी! Apple ची फोटोग्राफी स्पर्धा जिंकला; फोटो पाहून म्हणाल... कोल्हापूरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या प्रज्वल चौगुलेला अ‍ॅप्पलने बक्षीस दिले आहे. पहिल्या दहा फोटोंमध्ये त्याने काढलेल्या फोटोला नववा क्रमांक मिळाला आहे.

जगविख्यात कंपनी अ‍ॅप्पलचा फोटोग्राफीची स्पर्धा खूप मोठी असते. जगभरातून लाखो लोक त्यामध्ये भाग घेतात. यातून काही निवडक फोटो निवडले जातात आणि विजेते घोषित केले जातात. यंदा अ‍ॅप्पलने Shot on iPhone मायक्रो फोटोग्राफी चॅलेंज दिले होते. यामध्ये भारतीय तरुणाचा म्हणजेच आपल्या कोल्हापूरच्या तरुणाचा फोटो निवडण्यात आला आहे. 

कोल्हापूरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या प्रज्वल चौगुलेला अ‍ॅप्पलने बक्षीस दिले आहे. पहिल्या दहा फोटोंमध्ये त्याने काढलेल्या फोटोला नववा क्रमांक मिळाला आहे. अ‍ॅप्पलने शॉट ऑन आयफोन मायक्रो फोटोग्राफी चॅलेंजमध्ये २२ जानेवारी २०२२ पासून एन्ट्री घेण्यास सुरुवात केली होती. यामध्ये प्रज्वलने एक फोटो पाठविला होता. महत्वाचे म्हणजे या फोटोतील दृष्य आपल्या सर्वांनाच हिवाळ्यात दिसते. परंतू ते प्रज्वलने त्याच्या आयफोनमध्ये टिपले आणि जिंकला. 

प्रज्वलने काढलेला फोटो अ‍ॅप्पलच्या अधिकृत वेबसाईटवर फिचर केला जाणार आहे. त्याच्यासोबत चीन, हंगेरी, इटली, स्पेन, थायलंड आणि अमेरिकेतील आयफोन युजर्सचे फोटो आहेत. याशिवाय अ‍ॅप्पलच्या इन्स्टाग्राम हँडलवर आणि निवडक शहरांच्या बिलबोर्डवर झळकवणार आहे. या स्पर्धेत ज्या देशातील लोक जिंकले आहेत त्या देशातही हे फोटो फिचर केले जाणार आहेत. या फोटोग्राफीमध्ये iPhone 13 Pro Max च्या मायक्रो कॅमेऱ्याला हायलाईट करायचे होते. या स्पर्धेत भाग घेण्याऱ्या आयफोन युजर्सना iPhone 13 Pro किंवा  iPhone 13 Pro Max च्या मायक्रो लेन्सने फोटो काढायचे होते. 

Prajwal Chougule ने कोळ्याचे जाळे आणि त्यावर हिवाळ्यात लगडलेले दवबिंदू असा सुरेख फोटो क्लिक केला. हा फोटो मोती एका धाग्यात अडकविल्यासारखे भासत होते. यावर प्रज्वलने त्याला निसर्गाची फोटो ग्राफी करण्यास आवडते. मॉर्निंग वॉकला जात असताना कोळ्याचे जाळे दिसले त्याचा फोटो काढला, असे त्याने सांगितले. 

टॅग्स :Apple Incअॅपलkolhapurकोल्हापूर