एआयमुळे झाले मोठे काम! गेल्या अनेक वर्षापासून या आजाराने होत्या त्रस्त; फटक्यात झाले काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 13:46 IST2025-08-24T13:44:11+5:302025-08-24T13:46:38+5:30
एआयचा वापर सगळीकडेच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एआयमुळे अनेकांचा फायदाही झाला आहे.

एआयमुळे झाले मोठे काम! गेल्या अनेक वर्षापासून या आजाराने होत्या त्रस्त; फटक्यात झाले काम
सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकजण आपल्या कामात एआयची मदत घेत आहेत. एआयच्या मदतीने कामही सोपी झाली आहेत. एआयमुळे एक चमत्कार घडल्याचे समोर आले आहे. ५५ वर्षीय सारा इझेकिएल यांचा गेल्या २५ वर्षापासून आवाज गेला होता. आता एआयमुळे त्यांचा आवाज त्यांना पुन्हा मिळाला आहे. त्यांना २५ वर्षांपूर्वी मोटर न्यूरॉन आजाराचे निदान झाले होते. या आजारात मानवी शरीराच्या नसा आणि स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे बोलण्यात, गिळण्यात आणि चालण्यात त्रास होतो. नंतर, आवाजही हळूहळू निघून जातो. सारा यांच्या बाबतीतही असेच घडले. आता कुटुंबातील आठ सेकंदांच्या जुन्या व्हिडीओ क्लिपचा वापर करून सारा यांचा आवाज परत आणण्यात आला आहे.
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
सापडलेल्या सारा यांच्या जुन्या क्लिपमध्ये त्या त्यांच्या मुलीसोबत बोलत होत्या. शास्त्रज्ञांनी या क्लिपमधून सारा यांच्या आवाजाचा आठ सेकंदांचा ऑडिओ नमुना घेतला. हा नमुना वापरून, एआयला प्रशिक्षण देण्यात आले. याद्वारे, सारा यांच्या आवाजाचा स्वर, पिच आणि बोलण्याची पद्धत काय आहे हे सांगण्यात आले. या प्रशिक्षणाच्या आधारे, एआय मॉडेलने एक कृत्रिम आवाज विकसित केला. हा आवाज अगदी सारा इझेकिएल यांच्या आवाजासारखाच आहे.
आता सारा त्यांच्या डोळ्यांनी बोलतात
सारा बोलण्यासाठी एका खास तंत्राचा वापर करतात. यासाठी त्या त्यांच्या डोळ्यांनी संगणकावर टाइप करतात. त्यानंतर, एआय सारा यांनी लिहिलेले स्वतःच्या आवाजात बोलतो. अशा प्रकारे, सारा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी त्यांच्या स्वतःच्या आवाजात बोलू शकतात.