नवीन दमदार पोकोफोन सादर; 64MP कॅमेरा, 67W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh बॅटरीसह Poco X3 GT लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: July 29, 2021 11:27 AM2021-07-29T11:27:38+5:302021-07-29T11:29:16+5:30

POCO X3 GT launch: पोको एक्स3 जीटी मध्ये 8GB रॅम, MediaTek Dimensity 1100 चिपसेट, 67W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh ची बॅटरी असे दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. 

poco x3 gt launched as rebranded Redmi Note 10 Pro 5G phone know specs price sale offer  | नवीन दमदार पोकोफोन सादर; 64MP कॅमेरा, 67W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh बॅटरीसह Poco X3 GT लाँच 

पोको एक्स3 जीटीच्या 8 जीबी रॅम + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत अंदाजे 21,000 रुपये ठेवण्यात आली आहे.

Next

POCO ने मिडरेंज सेगमेंटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने जागतिक बाजारात नवीन व दमदार Poco X3 GT स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन सध्या मलेशियामध्ये लाँच करण्यात आला आहे आणि लवकरच हा फोन इतर बाजारपेठांमध्ये लौंच केला जाईल. परंतु भारतात हा फोन येणार नसल्याची माहिती पोको इंडियाचे डायरेक्टर अनुज शर्मा यांनी दिली आहे. पोको एक्स3 जीटी मध्ये 8GB रॅम, MediaTek Dimensity 1100 चिपसेट, 67W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh ची बॅटरी असे दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.  (POCO X3 GT launched with Dimensity 1100, 64MP triple cameras, 67W fast charging)

Poco X3 GT ची किंमत  

मलेशियामध्ये पोको एक्स3 जीटीच्या 8 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत RM 1199 (अंदाजे 21,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. तसेच फोनचा 8 जीबी रॅम + 256 जीबी इंटरनल मेमरी व्हेरिएंट RM 1399 (अंदाजे 24,500 रुपये) मध्ये उपलब्ध होईल.  

Poco X3 GT चे स्पेसिफिकेशन्स 

पोको एक्स3 जीटी स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेकचा डायमनसिटी 1100 चिपसेट देण्यात आला आहे. हा पोको फोन अँड्रॉइड 11 आधारित मीयुआय 12.5 वर चालतो. वर सांगितल्याप्रमाणे फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.  

Poco X3 GT मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 

Web Title: poco x3 gt launched as rebranded Redmi Note 10 Pro 5G phone know specs price sale offer 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app