केंद्र सरकारने सुरू केलेली 'प्रधानमंत्री सूर्य घर: मोफत वीज योजना' (PM Surya Ghar: Muft Bijli Yojana) संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे. सरकारने या योजनेच्या माध्यमाने तब्बल 1 कोटी घरांना मोफत वीज देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामुळे, देशातील एक कोटी घरांचे छत लवकरच 'मिनी पॉवर प्लांट' बनणार आहे. या योजनेतून केवळ ३०० युनिट्सपर्यंत मोफत वीज मिळणार नाही, तर अतिरिक्त तयार झालेली वीज सररकारला विकून कमाई करण्याची संधीही नागरिकांना मिळणार आहे.
असा आहे योजनेचा मुख्य उद्देश -या महत्त्वाकांक्षी योजनेचा मुख्य उद्देश देशातील १ कोटी घरांवर सौर ऊर्जा पॅनेल (Solar Rooftop System) बसवून त्यांना ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवणे आणि वीज बिल कमी करणे असा आहे. यामुळे वीज बिलात वार्षिक रु. १५,००० ते रु. १८,००० पर्यंतची बचतही होईल.
किती मिळते सबसिडी? -महत्वाचे म्हणजे, सौर उर्जा पॅनेलच्या इन्स्टॉलेशनसाठी सरकारकडून १ KW ते ३ KW आणि त्याहून अधिकसाठी ३० हजार ते ७८ हदार पर्यंत सबसिडीही मिळते.
असा करा ऑनलाईन अर्ज... -
- सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत पोर्टलवर https://pmsuryaghar.gov.in जा.- 'Consumer' पेजवर जाऊन 'Apply Now' सिलेक्ट करा आणि 'Consumer Login' निवडा.- नोंदणीसाठी तुमचा वैध नोंदणीकृत ग्राहक मोबाईल नंबर टाका, कॅप्चा कोड भरा आणि दिशा-निर्देश स्वीकारून 'Verify' वर क्लिक करा.- मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून लॉगिन करा.- आपले नाव, ईमेल, पिन कोड इत्यादी तपशील भरून 'Save' करा.- 'अप्लाई फॉर सोलर रूफटॉप' (Apply for Solar Rooftop) या पर्यायावर क्लिक करा.- राज्य, जिल्हा आणि वीज वितरण कंपनी/युटिलिटी निवडा आणि तुमचा ग्राहक खाते क्रमांक टाकून 'फेच डिटेल्स' (Fetch Details) वर क्लिक करा.- ग्राहक तपशील लोड झाल्यावर 'Next' वर क्लिक करून तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट करा.
Web Summary : The PM Surya Ghar scheme aims to provide free electricity to one crore homes by installing solar panels. Apply online for subsidies up to ₹78,000 and potentially earn by selling excess power back to the government. Save ₹15,000-₹18,000 annually on electricity bills.
Web Summary : पीएम सूर्य घर योजना का उद्देश्य सौर पैनल स्थापित करके एक करोड़ घरों को मुफ्त बिजली प्रदान करना है। ₹78,000 तक की सब्सिडी के लिए ऑनलाइन आवेदन करें और संभावित रूप से सरकार को अतिरिक्त बिजली बेचकर कमाएं। बिजली बिलों पर सालाना ₹15,000-₹18,000 बचाएं।