शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

शाओमीचे खास बालकांसाठी फोन वॉच

By शेखर पाटील | Published: May 21, 2018 10:54 AM

शाओमी कंपनीने मी बनी चिल्ड्रन फोनवॉच २ सी बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून नावातच नमूद असल्यानुसार हे मॉडेल खास मुलांसाठी विकसित करण्यात आले आहे.

शाओमी कंपनीने मी बनी चिल्ड्रन फोनवॉच २ सी बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून नावातच नमूद असल्यानुसार हे मॉडेल खास मुलांसाठी विकसित करण्यात आले आहे.शाओमीने आधीच मी बनी चिल्ड्रन फोनवॉच बाजारपेठेत सादर केले असून याचीच दुसरी आवृत्ती आता लाँच करण्यात आली आहे. हे स्मार्टवॉच असून यामध्ये कॉलींग करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे यात जीपीएस हे इनबिल्ट अवस्थेत देण्यात आले आहे. यामुळे हे वॉच वापरणारे बालक कुणेही गेले तरी त्याचे अचूक लोकेशन त्याच्या पालकांना कळू शकते. सुरक्षेसाठी हे फिचर अतिशय महत्वाचे मानले जात आहे. तसेच हे मॉडेल वॉटरप्रूफ असल्यामुळे ते अगदी पाण्यातदेखील सहजपणे वापरता येते. यामध्ये गोलाकार पीएमओएलईडी डिस्प्ले देण्यात आलेला असून हे मॉडेल स्काय ब्ल्यू आणि ऑरेंज या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.शाओमीच्या मी बनी चिल्ड्रन फोन वॉच २ सी या मॉडेलमध्ये नॅनो सीमकार्ड टाकण्याची सुविधा दिलेली आहे. याच्या मदतीने कॉल करता येतील. तसेच याचा वापर करून व्हाईस मॅसेजदेखील पाठवता येणार आहेत. यामध्ये संबंधीत युजर आपल्या पालकांच्या क्रमांकासह एकूण १० मोबाईल क्रमांक सेव्ह करून ठेवू शकतो. त्यांना आपत्कालीन अवस्थेत संदेश पाठविण्याची सुविधा यात करण्यात आली आहे. कनेक्टीव्हिटीसाठी यामध्ये ब्ल्यु-टुथ आणि वाय-फायची सुविधा देण्यात आली आहे. यात ३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. पहिल्यांदा हे मॉडेल चीनमध्ये सादर करण्यात आले आहे. नंतर याला भारतासह अन्य देशांमध्ये सादर करण्यात येईल अशी शक्यता आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल