शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

पालकांनो सावधान...! 'आ' आईचा की आत्महत्येचा? मोबाईलमुळे मुलांचा 'गेम' होतोय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 12:58 IST

ज्या कोवळ्या जिवांना फक्त आ आईचा हेच माहित असते त्यांना आता आ आत्महत्येचा हा लक्षात येत आहे. मुले अशा जाळ्यात फसून आत्महत्या करायला लागली आहेत.

- तन्मय दीक्षित, सायबर सिक्युरिटी तज्ञ, नाशिक

ब्लू व्हेल, मोमोसारख्या गेम्समुळे तरुणाई आत्महत्येच्या विळख्यात अडकलेली आहे. अनेकजण २४ तास फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप सारख्या सोशल मीडियात व्यस्त असतात. युट्युबवर अनेकांनी आत्महत्या करण्याची पद्धत, चोरी कशी करावी याबाबतचे व्हिडीओ बघितले आहेत. यामुळे तरुण वयातच ही पीढी सायबर गुन्ह्यांमध्ये अडकत आहे. मुलांना लहान वयातच मोबाईल खेळण्यासाठी दिले जातात. यामुळे त्यांना या मोबाईलची एवढी सवय लागली आहे की त्याशिवाय त्यांना करमत नाही. अगदी इंटरनेटचा रिचार्ज संपला असेल तरीही त्यांचा चिडचिडेपणा वाढला आहे. या मुलांना आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे. 

इंटरनेटचे व्यसन हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. टेलिकॉम कंपन्यांनी काही रुपयांत 1 जीबी अशी इंटरनेटची उधळण सुरु केली आहे. त्याचे दुष्परिणामही या मुलांवर होऊ लागले आहेत. सोशल नेटवर्किंग अ‍ॅप्सच्या व्यसनामुळे अहोरात्र मोबाईलवरच रेंगाळत असतात. शिवाय बऱ्याचदा खोली बंद करून बसल्यावर ते काय करतात हे आई वडिलांना सहसा समजत नाही. त्यांना वाटते की, आपला मुलगा हा कॉम्प्युटरवर अभ्यास करतोय. पण तो नक्की काय करत असतो. हे समजत नाही. पालकांकडून स्वतःच्या कामामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते व परिणामी तो मुलगा गॅजेटच्या आहारी जातो. इंटरनेटच्या अतिवापरामुळे डोळ्याचे त्रास, डोळ्यांसमोर अंधारी येणे, मनगटात वेदना, ऐकू कमी येणे, मान तसेच पाठ दुखणे, रात्री झोप उशीरा लागणे व पूर्ण न होणे, मेंदूविषयी आजार होणे व नेटगेममधे अती कॉन्संट्रेशन केल्याने मेंदू थकून जाऊन अभ्यासात एकाग्रता कमी होणे व त्यात मन न लागणे या सर्व गोष्टींना मुलांना सामोरे जावे लागत आहे.

इंटरनेट थ्रू किंवा सोशल नेटवर्किंग अ‍ॅप्स थ्रू अथवा फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर थ्रू एखादा नंबर अ‍ॅड करा. त्यानंतर त्यांनी दिलेल्या सूचना पाळा व त्या सूचना तुम्ही पूर्ण करत गेल्यास तुम्हाला काहीतरी नवीन मिळेल. पण तुम्ही त्या पूर्ण केल्या नाहीत तर मात्र विविध प्रकारच्या धमक्या देऊन घाबरवून सोडण्यात येते. हे आपल्याला वेळोवेळी बघायला मिळते आणि अशा प्रकारे लहान मुले सायबर क्राइमचे बळी बनतात व त्यांना काय करावे हे बऱ्याचदा समजत नाही.

खोटे बोलण्याची सवय जडते...आपणास हे ही माहित आहे की एक खोटं लपवण्यासाठी शंभरदा खोटे बोलावे लागते, त्याचप्रमाणे लहान मुलांची स्थिती होते. नेहमी गेमच खेळत असल्यामुळे ते काय करत होते ते सांगू शकत नाहीत व एखाद्या सापळ्यात अडकले की त्याच्या बद्दलसुद्धा, आपण फसलो जातोय, कुठल्या तरी चुकीच्या गोष्टीत गुंतलो जातोय हे घरातल्या मोठ्यांना सांगत नाहीत. यालाही दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे आपण अभ्यास न करता गेम खेळतो हे पालकांना समजेल आणि दुसरे म्हणजे या नेटगेमबद्दल त्यांना काहीच समजत नाही. मग त्यांच्याकडे काय मदत मागणार? पण मग हळूहळू ती मुले एकलकोंडी बनतात. पटकन कोणाशी बोलत नाहीत. त्यांच्या खाण्यापिण्यावरती, मोकळेपणावरती, वागणूकीवरती परिणाम दिसायला लागतो.

नेटगेमचे शिकार...आपल्याला बऱ्याच मानसतज्ज्ञांकडून हे लक्षात येते की या सर्वांचे मूळ कारण आहे इंटरनेट आणि मोबाइल, कॉम्प्युटर गॅजेटच्या रिलेटेड अशाप्रकारच्या सोशल अप्लिकेशनचे अॅडिक्शन, व्यसन.  सध्या मार्केटमध्ये नवीनच एक अॅप्लिकेशन अथवा गेम आलेला आहे कि जो सोशल नेटवर्किंग साइट्स आणि व्हॉट्सअॅप थ्रू सर्क्युलेट केला जातो. यांच्यामध्ये प्रामुख्याने बघितले जाते की आपण कुठल्याही प्रकारे तो नंबर जर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केला तर आपणास त्या नंबरवरून मेसेज येतात व हळूहळू चॅटिंग सुरू होते. त्यानंतर या नंबरवरून काही थ्रिलिंग इन्स्ट्रक्शन दिल्या जातात व लहान मुले ते वाचून त्या इन्स्ट्रक्शननुसार वागू लागतात. या इन्स्ट्रक्शनमध्ये त्यांना एकेक वेगवेगळे नवनवीन चॅलेंज दिले जाते. आपल्या मित्राने अथवा मैत्रिणीने हे चॅलेंज पूर्ण केले आहे किंवा एक लेव्हल, दोन लेव्हल कंप्लीट झाली आहे आता आपण पण करू या प्रकारे ते नकळत असे या गेममधे अडकून जातात. जेणेकरून ते चॅलेंज पूर्ण करायच्या मागे ते स्वतःच्या जीवाचा पण विचार न करता, त्याच्या पुढे काय नवीन मिळेल या विचारात सुचना/चॅलेंज पूर्ण करत असतात.

ज्या कोवळ्या जिवांना फक्त आ आईचा हेच माहित असते त्यांना आता आ आत्महत्येचा हा लक्षात येत आहे. मुले अशा जाळ्यात फसून आत्महत्या करायला लागली आहेत. सुरुवातीला आपण पाहिल्यास ब्ल्यूव्हेल गेम आला होता आणि त्याच्यानंतर किकी येऊन गेला. यामध्ये पण लोक वाहतूक नियम तोडून चुकीच्या गोष्टी करत असल्यामुळे बऱ्याच जणांचे अपघात झाले होते. इंटरनेटवर असे बरेच विविध प्रकारचे गेम असतात उदाहरणार्थः हॉरर गेम, सुसाईड गेम चॅलेंज. पण हे अतीभयानक आणि जीवघेणे आहेत. 

मोमो गेमचे 200 हून अधिक बळीआताच आपण वर मुलांच्या नवीन आलेल्या मोमोगेमचे उदाहरण पाहिले. या गेमने संपूर्ण जगभरात गेल्या काही दिवसांतच दोनशेपेक्षा जास्त बळी घेतलेले आहेत. दुर्दैवाने त्या आई-वडिलांना त्यांच्या प्रेताच्या सोबत मिळालेल्या मोबाइलमधून लक्षात आले की मूल हे भयानक गेम खेळत होते. अशा प्रकारच्या गेम्समध्ये तुम्हाला भयानक व्हिडिओ, ऑडिओ क्लिप, चित्र-विचित्र चित्रपट असे पाठवून घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. 

उपाय काय?या वर उपाय म्हणजे आई-वडिलांनी मुलांना जास्तीत जास्त वेळ द्यावा, मोबाइलवर मुले काय करत आहेत याची मॉनिटर अॅक्टिव्हिटी ठेवावी. जेणेकरून ते इंटरनेटवर कोणाशी काय बोलत आहेत, चॅटिंग करत आहेत हे समजेल तसेच कोणत्याही भयानक गेममध्ये ते सहभागी तर होत नाहीयेत ना किंवा कुठल्या सायबर क्राइममध्ये बळी पडत नाहीयेत ना यांच्यावरती लक्ष देणे हे खूप महत्त्वाचे आहे.

टॅग्स :InternetइंटरनेटMobileमोबाइलSuicideआत्महत्या