शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

पॅनासोनिक पी 99 : जाणून घ्या सर्व फिचर्स

By शेखर पाटील | Published: September 29, 2017 9:16 AM

पॅनासोनिक कंपनीने फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा पी ९९ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना ७४९० रूपये मूल्यात सादर केला आहे.

पॅनासोनिक कंपनीने अलीकडच्या काळात भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्याभराचा विचार केला असता, एल्युगा रे ५००, एल्युगा रे ७०० आणि एल्युगा आय ४ हे तीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. यानंतर आता पॅनासोनिक पी ९९ हा स्मार्टफोन ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. वर नमूद केलेल्या मॉडेलप्रमाणे पी ९९ हे मॉडेलदेखील किफायतशीर दरातील आहे.

पॅनासोनिक पी ९९ या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच ७२० बाय १२८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल. क्वॉड-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या स्मार्टफोनची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून  या प्रणालीत असणार्‍या गुगल असिस्टंट, स्प्लीट स्क्रीन आणि मल्टी-टास्कींग या फिचर्सचा लाभ युजरला मिळणार आहे. तर हे मॉडेल शॅम्पेन गोल्ड, ब्लॅक आणि ब्ल्यू या तीन आकर्षक रंगांमध्ये ग्राहकांना सादर करण्यात आले आहे.

पॅनासोनिक पी ९९ या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅश आणि ऑटो-फोकस प्रणालींसह ८ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. या दोन्ही कॅमेर्‍यांमध्ये ब्युटी मोड, बर्स्ट शॉट मोड, लो-लाईटसाठी नाईट मोड, मॅन्युअल कंट्रोलसाठी  प्रो-मोड, वॉटरमार्क, एचडीआर आणि पॅनोरामा मोड आदी महत्वाचे फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत.  यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. मात्र यात फिंगरप्रिंट स्कॅनर नसेल. पॅनासोनिक पी ९९ हे मॉडेल देशभरातील मोबाईल शॉपीजमधून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल