क्रेडिट कार्ड साईजचा फोन लॉन्च, जाणून घ्या खासियत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 15:46 IST2018-10-16T15:46:06+5:302018-10-16T15:46:46+5:30
तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. आता क्रेडिट कार्डच्या आकारा एवढा Palm फोन लॉन्च झाला आहे. याची खासियत म्हणजे हा एक सेकंडरी फोन आहे.

क्रेडिट कार्ड साईजचा फोन लॉन्च, जाणून घ्या खासियत!
(Image Credit : 9to5google.com)
आता क्रेडिट कार्डच्या आकारा एवढा Palm फोन लॉन्च झाला आहे. याची खासियत म्हणजे हा एक सेकंडरी फोन आहे. म्हणजे हा फोन तुमच्या अॅन्ड्रॉईड/अॅपल फोनसोबत काम करेल. तुमचा प्रायमरी फोन आणि पाम फोन एकाच मोबाईल नंबरवर काम करेल. जर तुम्ही कुठे जॉगिंगला जात असाल तर तुमचा दुसरा फोन सोबत घेऊन जाण्याऐवजी पाम फोन घेऊन जाऊ शकता. याने फोन पडण्याची भीतीही वाटणार नाही.
पाम फोनमध्ये ३.३ इंचाचा डिस्प्ले दिला गेलाय, ज्यात हाय पिक्सल डेनसिटी एलसीडी पॅनल देण्यात आलाय. सध्या हा फोन अमेरिकेत सादर करण्यात आलाय आणि फोनची किंमत २५ हजार रुपये आहे. हा एक अॅन्ड्रॉईड फोन असून सहजपणे हातात बसू शकतो. या फोनची विक्री नोव्हेंबर महिन्यापासून सुरु होणार आहे. फोनमध्ये फेस अनलॉक सिक्युरिटी फीचर देण्यात आलं आहे.
हा एक सिंगल सिम फोन आहे आणि हा फोन अॅन्ड्रॉईड ८.१ ओरियोवर काम करतो. यात ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. परफॉर्मन्ससाठी यात स्नॅपड्रॅगन ४३५ प्रोसेसर दिलं आहे. कॅमेराबाबत सांगायचं तर यात १२ मेगापिक्सलचा रिअर आणि ८ मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये ८०० एमएएचची बॅटरी आहे.
कंपनीने दावा केला आहे की, एकदा फुल चार्ज केल्यावर फोन ३ पेक्षा जास्त दिवस चालू राहतो. त्यासोबतच फोनमध्ये हेडफोनसाठी ३.५ एमएम जॅक दिला नाहीये.