डेटा संपला? नो टेन्शन, Airtel कडे एकापेक्षा एक स्वस्त प्लॅन, 19 रुपयांपासून सुरुवात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 20:41 IST2023-06-06T20:40:54+5:302023-06-06T20:41:09+5:30

तुम्ही Airtel युजर असाल तर या प्लॅन्सबद्दल जाणून घ्या.

Out of data? No tension, Airtel has one of the cheapest plans, starting from Rs 19 | डेटा संपला? नो टेन्शन, Airtel कडे एकापेक्षा एक स्वस्त प्लॅन, 19 रुपयांपासून सुरुवात...

डेटा संपला? नो टेन्शन, Airtel कडे एकापेक्षा एक स्वस्त प्लॅन, 19 रुपयांपासून सुरुवात...

जिओ येण्यापूर्वी आपल्याला महिन्याला एक किंवा दोन जीबी डेटा मिळायचा. पण, जिओ आल्यानंतर दररोज एक, दोन, तीन किंवा त्यापेक्षा जास्त डेटा मिळतोय. पण, आजकाल अनेक असे ग्राहक आहेत, ज्यांना आपल्या डेली डेटापेक्षा जास्त डेटा लागतो. अशा ग्राहकांसाठी Airtel कडे स्वस्त दरात एकापेक्षा एक डेटा प्लॅन्स आहेत. 

तुम्ही एअरटेल युजर असाल आणि तुमचा डेली डेटा संपला असेल, तर कंपनीकडे अनेक स्वस्त प्लॅन्स आहेत, ज्याचा वापर तुम्ही करू शकता. तुमचा डेली डेटा संपल्यावर तुम्ही कमी किमतीत डेटा मिळवू शकता. या प्लॅन्सची सुरुवात 19 रुपयांपासून होते. 

100 रुपयांपेक्षा कमी किमतीचे डेटा प्लॅन्स:
19 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1 GB डेटा 1 दिवसाच्या वैधतेसह.
29 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1 दिवसाच्या वैधतेसह 2 GB डेटा.
49 रुपयांचा प्लॅनमध्ये 1 दिवसाच्या वैधतेसह 6 GB डेटाचा लाभ.
59 रुपयांच्या प्लॅनमध्ये सध्याचा प्लॅन संपेपर्यंत 3 जीबी डेटा.
65 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सला 4 जीबी डेटा दिला जात आहे. या योजनेची वैधता तुमच्या विद्यमान प्लॅनसारखीच.
98 रुपयांचा प्लानमध्ये 5 जीबी डेटाचा फायदा मिळतो. या प्लॅनची ​​वैधता सध्याच्या प्लॅनसारखीच आहे. 

Web Title: Out of data? No tension, Airtel has one of the cheapest plans, starting from Rs 19