ई-सिम सपोर्टसह OPPO Watch 2 लाँच; हार्ट रेट सेन्सर आणि SpO2 मॉनीटरिंगसह स्मार्टवॉच सादर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 02:31 PM2021-07-28T14:31:42+5:302021-07-28T14:32:26+5:30

Oppo watch 2 launch: OPPO Watch 2 स्मार्टवॉचमध्ये 1GB RAM आणि 8GB स्टोरेज मिळते. यात 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड आहेत.

Oppo watch 2 launched with e sim support check price and features  | ई-सिम सपोर्टसह OPPO Watch 2 लाँच; हार्ट रेट सेन्सर आणि SpO2 मॉनीटरिंगसह स्मार्टवॉच सादर 

ई-सिम सपोर्टसह OPPO Watch 2 लाँच; हार्ट रेट सेन्सर आणि SpO2 मॉनीटरिंगसह स्मार्टवॉच सादर 

Next

ओप्पोने चीनमध्ये नवीन स्मार्टवॉच सादर केला आहे. हा स्मार्टवॉच OPPO Watch 2 नावाने लाँच करण्यात आला आहे. या ओप्पो स्मार्टवॉचमध्ये कंपनीने Snapdragon Wear 4100 प्रोसेसर, AMOLED डिस्प्ले आणि मोठी बॅटरी दिली आहे. हा स्मार्टवॉच e-SIM ला सपोर्ट करतो, त्यामुळे यावर व्हॉईस कॉल आणि कॉल फार्वड सारखे फीचर वापरता येतील.  

OPPO Watch 2 स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स 

OPPO Watch 2 दोन आकारत लाँच करण्यात आला आहे. स्मार्टवॉचचा 42mm स्क्रीन साइज असलेला मॉडेल ब्लूटूथ आणि eSIM व्हेरिएंटमध्ये लाँच केला गेला आहे. तर 46mm साइज असलेला मॉडेल e-SIM सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. ओप्पोच्या 42mm मॉडेलमध्ये 1.75-इंचाचा फ्लॅट अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यातील 360mAh ची बॅटरी एका तासात फुल चार्ज होऊन 10 दिवसांचा बॅकअप देऊ शकते.  

ओप्पोच्या 46mm मॉडेलमध्ये 1.91-इंचाचा अ‍ॅमोलेड कर्व एजसह देण्यात आला आहे. या मॉडेलमधील 510mAh ची बॅटरी 16 दिवसांचा बॅकअप देते. OPPO Watch 2 मध्ये कंपनीने Qualcomm Snapdragon Wear 4100 चिपसेट आणि Apollo 4s को-प्रोसेसर दिला आहे. सोबत 1GB RAM आणि 8GB स्टोरेज मिळते.  

Oppo Watch 2 मध्ये अनेक सेन्सर दिले आहेत, यात प्रामुख्याने ऑप्टिकल हार्ट सेन्सर आणि SpO2 मॉनीटरिंग सेन्सर मिळतो. हा स्मार्टफोन 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोडसह येतो. यात Android 8.1 Oreo वर आधारित ColorOS Watch 2.0 देण्यात आला आहे. OPPO Watch 2 मध्ये कनेक्टिविटीसाठी 4G LTE, Wi-Fi 5, Bluetooth 5.0, GPS, आणि NFC देखील आहे.  

OPPO Watch 2 ची किंमत 

OPPO Watch 2  42mm (ब्लूटूथ व्हर्जन) 1,299 RMB (अंदाजे 14,900 रुपये)  

OPPO Watch 2  42mm (e-SIM व्हर्जन) 1,499 RMB (अंदाजे 17,200 रुपये)  

OPPO Watch 2  46mm 1,999 RMB (अंदाजे 22,900 रुपये)  

 

Web Title: Oppo watch 2 launched with e sim support check price and features 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app