शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

64MP कॅमेरा असलेल्या Oppo Reno 6 Pro 5G फोनचा पहिला सेल आज, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: July 20, 2021 11:37 AM

Oppo Reno 6 Pro 5G First Sale: Oppo Reno 6 Pro 5G ची विक्री आजपासून सुरु होईल, हा स्मार्टफोन फ्लिपकार्टसह ओप्पोच्या वेबसाईट आणि इतर रिटेलर्सकडून विकत घेता येईल.  

ओप्पोने गेल्या आठवड्यात भारतात आपल्या रेनो 6 सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन लाँच केले होते. यात Oppo Reno 6 Pro 5G आणि Oppo Reno 6 5G चा समावेश करण्यात आला होता. हे दोन्ही स्मार्टफोन लाँच झाल्यावर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाले होते. यापैकी Oppo Reno 6 Pro 5G आजपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.  (Oppo Reno 6 Pro 5G sale in India today)

Oppo Reno 6 Pro 5G ची किंमत 

Oppo Reno 6 Pro 5G फोन भारतात एकमेव 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, या मॉडेलची किंमत 39,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 20 जुलै म्हणजे आजपासून ऑरोरा आणि स्टेलर ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. ओप्पो रेनो 6 प्रो 5जी स्मार्टफोन ओप्पोच्या ऑनलाईन स्टोरसह फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजिटल, विजय सेल्स, क्रोमा आणि इतर रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येईल.  

OPPO Reno 6 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स  

OPPO Reno 6 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा ओएलईडी कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या ओप्पो फोनमध्ये MediaTek Dimensity 1200 SoC देण्यात आली आहे. फोनमध्ये 12GB रॅम देण्यात आला आहे, हा रॅम 7GB पर्यंत वर्च्युअली एक्सपांड करता येईल. थोडक्यात यात 19GB पर्यंत रॅम वापरता येईल. ओप्पो रेनो 6 प्रो 5जी फोन अँड्रॉइड 11 आधारित ColorOS 11.3 वर चालतो. 

फोटोग्राफीसाठी OPPO Reno 6 Pro 5G मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा मोनो सेन्सर मिळतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. पावर बॅकअपसाठी Reno 6 Pro 5G मध्ये 65W फास्ट चार्जिंगसह 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

टॅग्स :oppoओप्पोFlipkartफ्लिपकार्टtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड