डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 21:50 IST2025-10-16T21:49:13+5:302025-10-16T21:50:11+5:30
Best Camera Smartphones: चांगला कॅमेरा असलेल्या फोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांना आनंदाची बातमी आहे.

डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
चांगला कॅमेरा असलेल्या फोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांना आनंदाची बातमी आहे. ओप्पोने त्यांचे दोन नवीन स्मार्टफोनओप्पो फाइंड एक्स९ आणि ओप्पो फाइंड एक्स९ प्रो चीनी बाजारात अधिकृतपणे लॉन्च केले. हे दोन्ही फोन उत्कृष्ट कॅमेरा क्षमता आणि उच्च दर्जाच्या डिस्प्लेच्या समावेशामुळे त्यांना डीएसएलआरसारखा अनुभव देतात. यातील पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आणि Sony LYT 828 सेन्सर यामुळे फोटोग्राफीच्या शौकिनांसाठी हे एक आदर्श निवड ठरू शकते.
ओप्पो फाइंड एक्स९ प्रोमध्ये ६.७८-इंच एलटीपीओ डिस्प्ले आहे, ज्याचा रिजोल्यूशन २७७२×१२७२ पिक्सेल आहे. ओप्पो फाइंड एक्स९ मध्ये ६.५९-इंच 1.5K डिस्प्ले आहे, ज्याचा रिजोल्यूशन २७६०×१२५६ पिक्सेल आहे. दोन्ही फोन १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १८०० निट्स पीक ब्राइटनेससह येतात. यामध्ये ProXDR डिस्प्ले HDR Vivid, Dolby Vision आणि HDR10+ ला सपोर्ट करतो आणि फुल-स्क्रीन ऑलवेज ऑन डिस्प्ले फीचर्स देखील उपलब्ध आहे.
ओप्पो फाइंड एक्स९ प्रोमध्ये २०० मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आहे, ज्यामुळे अत्यधिक जास्त झूमसह उत्कृष्ट फोटोग्राफी शक्य होईल. ओप्पो फाइंड एक्स९ मध्ये ५० मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा आहे, जो उच्च दर्जाच्या पोर्ट्रेट्स आणि टेलिफोटो शॉट्ससाठी चांगला पर्याय आहे.
ओप्पो फाइंड एक्सची किंमत
१२GB + २५६GB व्हेरिएंट ₹५४,३०० पासून (४,३९९ युआन)
१६GB + २५६GB व्हेरिएंट ₹५८,००० पासून (४,६९९ युआन)
१२GB + ५१२GB व्हेरिएंट ₹६१,७०० पासून (४,९९९ युआन)
१६GB + ५१२GB व्हेरिएंट ₹६५,४०० पासून (५,२९९ युआन)
१६GB + १TB व्हेरिएंट ₹७१,६०० पासून (५,७९९ युआन)
ओप्पो फाइंड एक्स प्रोची किंमत
१२GB + २५६GB व्हेरिएंट ₹६५,४०० पासून (५,२९९ युआन)
१२GB + ५१२GB व्हेरिएंट ₹७०,३०० पासून (५,६९९ युआन)
१६GB + ५१२GB व्हेरिएंट ₹७४,१०० पासून (५,९९९ युआन)
१६GB + १TB व्हेरिएंट ₹८२,७०० पासून (६,६९९ युआन)