ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 14:32 IST2025-09-15T14:32:05+5:302025-09-15T14:32:52+5:30

OPPO F31 Series Launched: ओप्पोने त्यांची नवीन स्मार्टफोन मालिका ओप्पो एफ ३१ मालिका भारतात लॉन्च केली, यात ओप्पो एफ ३१, ओप्पो एफ ३१ प्रो आणि ओप्पो एफ ३१ प्रो प्लस यांचा समावेश आहे.

OPPO F31 series smartphones with 7000mAh battery launched: Price, specs | ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत

ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत

ओप्पोने त्यांची नवीन स्मार्टफोन मालिका ओप्पो एफ ३१ मालिका भारतात लॉन्च केली, यात ओप्पो एफ ३१, ओप्पो एफ ३१ प्रो आणि ओप्पो एफ ३१ प्रो प्लस यांचा समावेश आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा आणि ३२ मेगापिक्सेलपर्यंतचा सेल्फी कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये ७००० एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली.

ओप्पो एफ ३१ प्रो आणि प्रो प्लसची विक्री १९ सप्टेंबरपासून सुरू होईल. तर, ओप्पो एफ ३१ हा फोन २७ सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. हे फोन कंपनीच्या ई-स्टोअर व्यतिरिक्त फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असतील. लाँच ऑफरमध्ये, फोनवर १० टक्के इन्स्टंट बँक डिस्काउंट उपलब्ध असेल. याशिवाय, वापरकर्त्यांना ३५०० रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्स्चेंज बोनस देखील मिळू शकेल. तसेच, हे फोन ६ महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकाल.

स्टोरेज आणि किंमत

- ओप्पो एफ ३१ हा फोन ८ जीबी रॅम/ १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम/ २५६ जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च झाला. त्याची सुरुवातीची किंमत २२ हजार ९९९ रुपये आहे.

- ओप्पो एफ ३१ प्रो हा फोन ८ जीबी रॅम/ १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम/ २५६ स्टोरेज आणि १२ जीबी रॅम/ २५६ स्टोरेज मध्ये सादर करण्यात आला, त्याची सुरुवाती किंमत २६ हजार ९९९ रुपये आहे. 

- ओप्पो एफ३१ प्रो+ बद्दल बोलायचे झाले तर, ते ८ जीबी + २५६ जीबी आणि १२ जीबी + २५६ जीबी मध्ये येते. त्याची सुरुवातीची किंमत ३२,९९९ रुपये आहे.

ओप्पो एफ ३१: फीचर्स

कंपनी या फोनमध्ये ६.५७ इंचाचा डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले १२०Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फुल एचडी डिस्प्लेचा पीक ब्राइटनेस लेव्हल १४०० निट्स आहे. फोनमध्ये १२ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज पर्याय आहेत. प्रोसेसर म्हणून, कंपनी फोनमध्ये डायमेन्सिटी ६३०० एनर्जी चिपसेट देत आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा १६ मेगापिक्सेल आहे. IP66 + IP68 + IP69 रेटिंग असलेल्या या वॉटरप्रूफ फोनमध्ये ७०००mAh ची बॅटरी आहे, जी ८० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

ओप्पो एफ ३१ प्रो: फीचर्स

या फोनमध्ये फुल एचडी रिझोल्यूशनसह ६.५७ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला. हा ओएलईडी १४०० निट्सच्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह येतो. हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. हे डिव्हाइस डायमेन्सिटी ७३०० एनर्जी चिपसेटवर काम करते. फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला. तर, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये दिलेली बॅटरी ७००० एमएएच आहे, जी ८० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन वॉटरप्रूफ रेटिंगसह येतो. यामध्ये तुम्हाला बायोमेट्रिक सिक्युरिटीसाठी इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल.

ओप्पो एफ ३१ प्रो प्लस: फीचर्स

फोनमध्ये, कंपनी २८०० x १२८० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.८ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. त्याची पीक ब्राइटनेस लेव्हल १६०० निट्स आहे. कंपनीने हा फोन १२ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज पर्यायासह लॉन्च करण्यात आला. त्याचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा आहे आणि सेल्फी कॅमेरा ३२ मेगापिक्सेलचा आहे. हा फोन डायमेन्सिटी ७३०० प्रोसेसरवर काम करतो. वॉटरप्रूफ रेटिंग असलेल्या या फोनची बॅटरी ७०००mAh आहे. ही बॅटरी ८० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन ओप्पो फोन अँड्रॉइड १५ वर आधारित कलरओएस १५.० वर काम करते.

Web Title: OPPO F31 series smartphones with 7000mAh battery launched: Price, specs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.