3000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येतोय Oppo चा धमाकेदार फोन; जाणून घ्या ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 07:14 PM2021-11-11T19:14:42+5:302021-11-11T19:17:16+5:30

OPPO F19s Price In India: फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या ओप्पो अ‍ॅडव्हान्स अडवांस डे सेलमध्ये Oppo F19s स्मार्टफोन 3000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. अ‍ॅक्सिस, बँक ऑफ बडोदा आणि कोटक बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास 2000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल

Oppo f19s available with discount of rupees 3000  | 3000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येतोय Oppo चा धमाकेदार फोन; जाणून घ्या ऑफर 

3000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येतोय Oppo चा धमाकेदार फोन; जाणून घ्या ऑफर 

Next

OPPO F19s Price In India: सप्टेंबरमध्ये ओप्पोने आपला एक नवीन स्मार्टफोन भारतात सादर केला होता. हा स्मार्टफोन OPPO F19s नावाने बाजारात आला होता. हा फोन ग्लोइंग ब्लॅक आणि ग्लोइंग गोल्ड अशा आकर्षक रंगात उपलब्ध आहे. आता फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या ओप्पो अ‍ॅडव्हान्स अडवांस डे सेलमध्ये Oppo F19s स्मार्टफोन 3000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल.  

Oppo F19s स्मार्टफोनचा 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट 22,990 रुपयांमध्ये लाँच झाला होता. परंतु या सेलमध्ये हा फोन 19,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचबरोबर अ‍ॅक्सिस, बँक ऑफ बडोदा आणि कोटक बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास 10 टक्के किंवा 2000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल.  

OPPO F19s चे स्पेसिफिकेशन्स  

ओप्पो एफ19एस मध्ये 6.43-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच-होल डिस्प्ले डिजाईनसह सादर करण्यात आलेला हा डिस्प्ले 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा एक अ‍ॅमोलेड पॅनल आहे त्यामुळे यात इन-डिस्प्ले फिंगप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.   

या ओप्पो मोबाईलमध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 662 चिपसेटचा वापर कंपनीने केला आहे. OPPO F19s अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 11 वर चालतो. त्याचबरोबर यात 6GB रॅम आणि 5GB एक्सटेंडेड रॅम देण्यात आला आहे. या फोनमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज आहे.  

OPPO F19s मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48MP चा मुख्य सेन्सर, 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP ची मॅक्रो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी SuperVOOC 2.0 टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.   

Web Title: Oppo f19s available with discount of rupees 3000 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app