ओप्पोचा स्वस्त OPPO A16 बाजारात दाखल; असे आहेत 5000mAh बॅटरी असलेल्या स्मार्टफोनचे स्पेक्स 

By सिद्धेश जाधव | Published: July 17, 2021 12:35 PM2021-07-17T12:35:45+5:302021-07-17T12:36:41+5:30

Oppo A16 launch: कंपनीने आपल्या स्वस्त ‘ए’ सीरीजमध्ये OPPO A16 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सध्या इंडोनेशियामध्ये सादर करण्यात आला असून लवकरच हा जगभरातील बाजारपेठांमध्ये दाखल होऊ शकतो. 

Oppo a16 launched helio g35 5000mah battery 13mp camera specs   | ओप्पोचा स्वस्त OPPO A16 बाजारात दाखल; असे आहेत 5000mAh बॅटरी असलेल्या स्मार्टफोनचे स्पेक्स 

OPPO A16 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Next

काही दिवसांपूर्वी ओप्पोने भारतात आपली फ्लॅगशिप ‘रेनो 6’ सीरिज लाँच केली होती. कंपनीने या सीरिजमध्ये Oppo Reno 6 5G आणि Oppo Reno 6 Pro 5G हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. आता कंपनीने आपल्या स्वस्त ‘ए’ सीरीजमध्ये OPPO A16 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सध्या इंडोनेशियामध्ये सादर करण्यात आला असून लवकरच हा जगभरातील बाजारपेठांमध्ये दाखल होऊ शकतो.  (OPPO A16 with MediaTek Helio G35 SoC, 5000mAh Battery Launched)

OPPO A16 चे स्पेसिफिकेशन्स 

इंडोनेशियामध्ये लाँच झालेल्या ओपो ए16 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 720 x 1600 पिक्सल आणि अस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. हा ओप्पो स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 11.1 वर चालतो. फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेजला मिळते. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.  

OPPO A16 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात आला आहे. सोबत 2 मेगापिक्सलची मोनो लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी ओपो ए16 10वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. 

OPPO A16 ची किंमत 

ओपोचा हा स्मार्टफोन इंडोनेशियामध्ये 3GB रॅम + 32GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. तिथे या फोनची किंमत IDR 1,999,000 आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 10,300 रुपयांच्या आसपास रूपांतरित होते. ओपो ए16 स्मार्टफोन पर्ल ब्लु, स्पेस सिल्वर आणि क्रिस्टल ब्लॅक कलरमध्ये लाँच केला गेला आहे. 

Web Title: Oppo a16 launched helio g35 5000mah battery 13mp camera specs  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.