आता फसवणूक, चोरीचं नो टेन्शन; संचार साथी हे सरकारी ॲप करणार मदत, 'अशी' करा तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 12:12 IST2025-01-18T12:09:35+5:302025-01-18T12:12:34+5:30
ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास या ॲपवर तक्रार करता येते.

आता फसवणूक, चोरीचं नो टेन्शन; संचार साथी हे सरकारी ॲप करणार मदत, 'अशी' करा तक्रार
दूरसंचार विभागाने ग्राहकांच्या मदतीसाठी ‘संचार साथी’ नावाचे मोबाइल ॲप नुकतेच लाँच केले आहे. आधी तक्रार करण्यासाठी यूजर्सना वेबसाइटवर जावे लागत असे, परंतु आता हे काम मोबाइलच्या आधारे सहजपणे करता येणार आहे.
ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास या ॲपवर तक्रार करता येते. हे ॲप हरवलेल्या, चोरी झालेल्या मोबाइल फोनचा मागोवा घेण्यास, अनधिकृत कनेक्शन ओळखण्यास, फसव्या कॉल्स व संदेशांची तक्रार करण्यास मदत करते.
हरवलेला फोन ट्रॅक करता येतो. यासाठी मोबाइल नंबर, मॉडेल, आयएमइआय नंबर, एफआयआरची क्रमांक यासह तुमची माहिती द्यावी लागते. हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे.