शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

22 हजारांत OnePlus चा दमदार 5G फोन, 6GB RAM आणि 64MP Camera सह लाँच  

By सिद्धेश जाधव | Published: April 20, 2022 1:07 PM

OnePlus Nord N20 5G स्मार्टफोन 64MP Camera, 6GB RAM, Snapdragon 695 चिपसेट, 33W फास्ट चार्जिंग आणि 4,500mAh च्या बॅटरीसह बाजारात आला आहे.

OnePlus लवकरच भारतात दोन नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. यात फ्लॅगशिप ग्रेड OnePlus 10R आणि मिडरेंज OnePlus Nord CE 2 Lite चा समावेश असू शकतो. परंतु तिकडे अमेरिकेत कंपनीनं आणखी एक स्वस्त स्मार्टफोन OnePlus Nord N20 5G नावानं लाँच केला आहे. यात 64MP Camera, 6GB RAM, Snapdragon 695 चिपसेट, 33W फास्ट चार्जिंग आणि 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

OnePlus Nord N20 5G चे स्पेसिफिकेशन्स  

वनप्लस नॉर्ड एन20 5जी मध्ये 6.43 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले पंच-होल डिजाईनसह मिळतो. यात हाय रिफ्रेश रेटसह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे. हा 5G फोन बेसिक कनेक्टिव्हिट ऑप्शन्ससह सादर करण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी मोबाईल फोनमध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

OnePlus Nord N20 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 11 बेस्ड आक्सिजनओएस 11 वर चालतो. यात क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटची प्रोसेसिंग पावर देण्यात आली आहे. सोबत 6 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी आहे. फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मोनोक्रोम लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळतो. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.  

किंमत  

अमेरिकन बाजारात OnePlus Nord N20 5G चा एकच व्हेरिएंट आला आहे. तिथे या फोनची किंमत 282 डॉलर म्हणजे जवळपास 21,500 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनी नॉर्ड एन सीरिज भारतात सादर करत नाही त्यामुळे हा फोन देशात येण्याची शक्यता कमी आहे.  

 
टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान